19 new cases of COVID-19 in Latur District
19 new cases of COVID-19 in Latur District 
मराठवाडा

COVID-19 : लातुरात दोन ज्येष्ठांचा मृत्यू, 19 पॉझिटिव्ह

सुशांत सांगवे

लातूर :  जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज एका कोरोनाबाधिताचा बळी जात असल्याचे समोर येत आहे. त्यातच लातूर जिल्ह्यात रविवारी (ता. 5) दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, दिवसभरात शहर आणि जिल्ह्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

उदगीरमधील रुग्णालयात एका कोरोनाबाधित ज्येष्ठ रुग्णाचा शनिवारी (ता. 4) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याची माहिती आरोग्य विभागाने आज (ता. ५) जाहीर केली. त्यामुळे उदगीरमधील मृतांची संख्या ८ झाली आहे. या रूग्णाचे वय ७६ होते. ते शहरातील देगलूर रस्ता भागात राहत होते. त्यांना रुग्णालयात गुरूवारी (ता. २) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अतिताणाचाही त्रास होता, असेही सांगण्यात आले.

या घटनेनंतर लातुरातील विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दमा व निमोनिया हे आजार होते त्यांचा उपचारादरम्यान आज (ता. 5) दुपारी साडेबारा वाजता मृत्यू झाला. ते शहरातील तेली गल्ली भागात राहत होते, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत दिवसभरात 240 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. यापैकी तब्बल 164 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 22 जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत तर 35 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

पॉझिटिव्ह अहवाल आलेले 17 रुग्ण लातूरमधील आहेत. तर उर्वरित 2 रुग्ण औसा आणि अहमदपुरमधील आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. संस्थेच्या रुग्णालयात एकूण 78 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या दाखल आहेत. आज 3 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण नेमक्या कुठल्या भागातील रहिवासी आहेत, हे अद्याप जाहीर झाले नाही.

  • एकूण बाधित : 460
  • उपचार सुरू असलेले : 190
  • बरे झालेले : 247
  • एकूण मृत्यू : 23

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT