19 percent water storage is left in Nathsagar Dam Marathwada water crisis Marathi news  
मराठवाडा

Nathsagar Dam Water Level : नाथसागर धरणात अवघे १९ टक्के पाणीसाठा! परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

Nathsagar Dam Water Level : उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच पैठण येथील नाथसागर धरणात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

चंद्रकांत तारू

पैठण : उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच पैठण येथील नाथसागर धरणात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी जुलैअखेरपर्यंत पुरेल, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

हा जलसाठा कमी होत चालल्याने पावसाळ्यापूर्वीचा आहे तो शिल्लक साठा संपतो की काय, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. परिणामी, एप्रिल महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, नाथसागर धरणातून‌ मराठवाड्यातील शेती सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी प्रत्येकवर्षी देण्याचे नियोजन केले जाते. यंदा मे महिन्यापूर्वीच पाणीपातळीने तळ गाठला आहे. तरीही धरण व्यवस्थापनाने जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडले. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची टंचाई लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने पाणीसाठा घटत आहे.

दिवसेंदिवस नाथसागर धरणाच्या पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पाणीसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक घटकाची आहे. पाण्याचे योग्य नियोजन प्रशासकीय स्तरावरून करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. पैठण तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील.
- संदीपान भुमरे, पालकमंत्री.

वाढत्या तापमानाचा मोठा फटका पाणीपातळीला बसला आहे. त्यामुळे यापुढील काळात पाणी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. नाथसागर धरणात सध्या उपलब्ध १९ टक्के पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी जुलैअखेरपर्यंत पुरेल.
- विजय काकडे, शाखा अभियंता, नाथसागर धरण, पैठण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT