Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी 22 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका 22 वर्षीय ऑटोरिक्षा चालक तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यभरात मराठा समाजाने आंदोलने, रास्तारोको, साखळी आंदोलने केली. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करत काही दिवसांचा वेळ घेतला आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेकांनी टोकाचं पाऊल उचलतं आपलं जीवन संपवलं आहे. अशातच आणकी एका तरूणाने आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका 22 वर्षीय ऑटोरिक्षा चालक तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या (Beed) धारूर तालुक्यात असणाऱ्या देवठाणा गावात घडली आहे. प्रवीण बाबुराव सोळंके (वय 22 रा. देवठाणा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मृत प्रवीणच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये "मी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे" असा मजकूर लिहिलेला आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय दहिफळे करत आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) राज्यभरात दौरे करत सभा घेत आहेत. या सभांमधून ते मराठा आरक्षणासाठी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तसेच जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT