मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्त मंगळवारी शहरातून 2 हजार 222 फुटांच्या तिरंग्यासह पदयात्रा काढण्यात आली. यात सहभागी विद्यार्थी 
मराठवाडा

औरंगाबादमध्ये निघाली 2,222 फुटांच्या तिरंग्याची पदयात्रा

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (एबीव्हीपी) मंगळवारी (ता. 17) शहरातून तब्बल 2,222 फूट लांबीच्या तिरंग्याची पदयात्रा काढण्यात आली. यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. 


सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणातून या पदयात्रेस प्रारंभ झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चव्हाण, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक महेश शिवणकर, उद्योजक राम भोगले, स्वप्नील बेगडे, स्वप्नील लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिरंगा पदयात्रेस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

तत्पूर्वी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात आला. ही पदयात्रा महात्मा फुले चौक, गुलमंडी, टिळपथ, पैठण गेट मार्गे जाऊन क्रांती चौकात तिचा समारोप झाला. यावेळी श्री. भोगले म्हणाले, ""देशाप्रती प्रेम वक्‍त करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे 365 दिवस असतात. आम्ही उद्योजक आमच्या सचोटीने केलेल्या कामातून तसेच नियमित कर भरणा करून देशशक्‍ती व्यक्‍त करतो.'' 

तिरंगा यात्रेवर पुष्पवृष्टी 
शहरातील मुख्य भागातून काढण्यात आलेल्या या तिरंगा यात्रेवर ठिक-ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य अनुराधा चव्हाण यांच्यात

एबीव्हीपीला महात्मा गांधीचे वावडे 
तिरंगा पदयात्रेत सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, शाहू महाराज, दीनदयाळ उपाध्ये, शामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावाचे बॅच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आले होते; मात्र स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महात्मा गांधीचा एबीव्हीपीला विसर पडला. बॅचमध्ये महात्मा गांधी यांचे छायाचित्र वगळता, इतर सर्व महापुरुषांचे छायाचित्र होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT