file photo 
मराठवाडा

परभणीत 23 किलो गांजा विशेष पथकाकडून जप्त

गणेश पांडे

परभणी  ः जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका लॉजमधून 23 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत एक लाख 13 हजार 785 रुपये किंमतीच्या गांजासह एकूण एक लाख 63 हजार 785 रुपयांचा मुद्देमालासह दोन जणांना पथकाने ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास परभणीतील बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये काही व्यक्तींनी अंमली पदार्थ गांजा अवैध विक्रीसाठी आणला असल्याची माहिती मिळाली होती. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस, फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, अजहर पटेल, अरुण कांबळे, दीपक मुंडे, विष्णू भिसे, यांच्यासह कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील, कर्मचारी आईटवार, श्री.लटपटे, श्री.वाघमारे, श्री.गायकवाड, रामा कदम आदींनी शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्री बाराच्या सुमारास लॉज परिसरात छापा टाकला. 

त्यावेळी तेथ दोन व्यक्ती आढळून आल्या. त्यांची चौकशी करीत त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळील तीन वेगवेगळ्या पिशव्यात अंमलपदार्थ गांजा आढळून आला. एका प्रवाशी बॅगमध्ये प्लास्टीक चिकटपट्टीच्या पॅकबंद पाकिटात दहा किलो 33 ग्रॅम वजनाचा अंदाजे 51 हजार 670 रुपयांचा गांजा अवैध विक्रीसाठी साठवलेला पथकास आढळून आला. दुसर्‍या बॅगमध्ये नऊ किलो 36 ग्रॅम अंदाजे 45 हजार 180 रुपये किंमतीचा तर अन्य तिसर्‍या बॅगमध्ये 16 हजार 935 रुपये किंमतीचा तीन किलो 387 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. पथकाने एक लाख 13 हजार 785 रुपयांचा गांजा जप्त केला. त्याचबरोबर या कारवाईत एक मोटारसायकल, मोबाईल असा एकूण एक लाख 63 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विकास दाभाडे व युवराज भदर्गे या दोघांना पथकाने ताब्यात घेत कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा अधिक तपास नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत. घटनास्थळास सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी भेट दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Asian Games, IND vs JPN : ३० चेंडूत पहिला विजय अन् भारतीय महिला संघाची पदकाच्या दिशेने कूच; यजमान जपानला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT