file photo 
मराठवाडा

हिंगोलीच्या पिंपरी खुर्द येथे २४ कोंबड्या मृत्यूमुखी; अलर्ट झोन जाहीर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे दोन दिवसात ३४ पैकी २४ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून जाहीर केला आहे.

या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्याना कोणता आजार झाला यांचा निष्कर्ष माहित नसल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित केला आहे. या साठी दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. जावळे यांनी गावात जाऊन पाहणी केली. तसेच मृत्यू मुखी पडलेल्या कोंबड्यांचे सॅम्पल भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्या रोगाचे निदान स्पस्ट होईल असे डॉ. जावळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रभावित ठिकाणी वाहनांच्या येजा करण्यास दहा किलोमीटर मनाई केली आहे.तसेच खबरदारी म्हणून या क्षेत्रात जिवंत व मृत कोंबड्या,अंडी,पक्षी खाद्य नेण्यास प्रतिबंध घातले आहेत. हा परिसर निर्जंतुकीकरण करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT