Jalkot elction
Jalkot elction 
मराठवाडा

Gram Panchayat election: 26 गाव कारभाऱ्यांचं भवितव्य धिम्या गतीन होतंय मतपेटीत बंद

शिवशंकर काळे

जळकोट(लातूर): तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या गावकारभाऱ्यांसाठी  सकाळी साडे सातपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गावखेड्यातील मतदान असल्यामुळे सकाळच्या सत्रात धिम्या गतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी बारा पर्यंत 25 टक्के मतदान झाले आहे.

तालुक्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या वाजरंवाडा, घोणसी, अतनुर, मरसांगवी, रावणकोळासह अन्य 21 ग्रामपंचायतीसाठी मतदान चालू आहे. यावेळी गावातील अनेक मजूर बाहेरगावी गेलेले मतदानादिवशी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सकाळपासून चार चाकी वाहन घेऊन गावात येत होते. वाहनाच्या खाली उतरल्यानंतर कोणतिही चर्चा न करताच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून नमस्कार करत आलेल्या वाहनातून परत जात होते.

दरम्यान तालुक्यातील कुणकी, हाळदवाढवणा, वाजरंवाडा, मरसांगवी संवेदनशील मतदान केंद्रावर शांततेत मतदान चालू होते. वयस्कर मतदारांना उमेदवारांचे कार्यकर्ते वार्डातून ऑटोमध्ये बसवून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सोडत होते. सर्वच मतदान केंद्रावर सॅनिटायझरचा वापर केला जात होता. मास्क घातल्याशिवाय मतदान केंद्रावर मतदानाला प्रवेश दिला जात नव्हता. मतदान करताना तोडावरील मास्क काढून ओळख पटवली जात होती.

सकाळी मतदार घरातील घरची कामे उरकून मतदानासाठी मतदान केंद्रावर येत असल्याने मतदान धिम्या गतीने चालू होते. दुपारी बाराच्या नंतर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची रांग दिसून होती. दिव्यांग मतदार मतदानासाठी उत्साहाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करताना दिसून येत होते. प्रत्येक उमेदवार मतदान केंद्रापासून शंभर मीटर बाहेर मतदाराला हात जोडून नमस्कार करत होते. दुपारी बारापर्यंत कोणत्याही मतदान केंद्रावरील ई.व्ही.मशिन नादुरूस्त दिसून आली नाही.

झोनल अधिकारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर जाऊन तेथील अडीअडचणी जाणून घेत होते. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार राजाराम खरात हे तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावरील आढावा घेऊन वरिष्ठांना यांची माहिती देत होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी हे दुरध्वनीवरुन तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्राची दर तासाला माहिती घेत होते.

एकंदरीत दुपारी बारा पर्यत तालुक्यातील २६ मतदान केंद्रावर शांततने मतदान चालू होते.पोलिस निरीक्षक गणेश सोडारे हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर भेटी देऊन पाहणी करत होते.दुपारी बारानंतर मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा दिसून येत होत्या.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT