3 arrested for theft in Hingoli Nanded16 mobiles two-wheelers and goods worth two lakhs seized sakal
मराठवाडा

Hingoli Crime : हिंगोली, नांदेडमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक; १६ मोबाईल, दुचाकीसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने इंटेलीजन्स बेस इन्व्हेस्टीगेशनच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत जबरी चोऱ्या करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १६ मोबाईल, एक खंजीर, दुचाकीसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने इंटेलीजन्स बेस इन्व्हेस्टीगेशनच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत जबरी चोऱ्या करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १६ मोबाईल, एक खंजीर, दुचाकीसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रपरिषदेत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ही माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक डख उपस्थित होते.

यावेळी कोकाटे यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी वसमत ते नांदेड मार्गावर कैलास कदम या मोबाईल विक्रेत्यास चोरट्यांनी लुटले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे, जमादार नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरीभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, दत्ता नागरे, इरफान पठाण यांची दोन पथके तैनात केली होती.

या पथकाने सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र फुटेज स्पष्ट नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली. पथकाने अधिक माहिती मिळवत सदर तिघेजण नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने नांदेड येथून हरज्योतसिंग चरणजितसिंग बिंद्रा, बलप्रितसिंग भुपेंद्रसिंग कदंब, रोहित मारोती जाधव (रा. वसरणी नांदेड) यांना अटक केली.

पोलिसांनी चौकशी केली असता तिघांनी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात सहा ठिकाणी जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेच्या कामगिरीबद्दल पथकाला पाच हजाराचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT