file photo 
मराठवाडा

तिन लाखासाठी ३२ हजार गमावले...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्ज मंजुर करून देतो म्हणून एकाला तिन लाखासाठी तब्बल ३२ हजाराने गंडविणाऱ्या उत्तरप्रदेशच्या एका भामट्याविरुध्द शुक्रवारी (ता. तिन) जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ता. १८ डिसेंबर रोजी भोकर येथे घडला. 

भोकर शहरातील तेलीगल्ली येथे राहणाऱ्या आनंद माधवराव कागळे (वय ३१) याच्यासोबत मोबाईलद्वारे गौरव मधुकर शर्मा रा. सेक्टर न. १९, नोयडा (उत्तरप्रदेश) याने ओळख पाडली. या ओळखीतून त्याने आनंद कागळे याला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. माझ्या बँकेमध्ये ओळखी आहेत. अनेकांना मी कर्ज मिळवून दिले. असे सांगून त्याचा आनंदचा विश्‍वास मिळविला. यावरून त्याने भोकर येथील आपल्या खात्यातून गौरव शर्मा यच्या बँक खात्यात तिन लाख रुपयाच्या कर्जासाठी वेगवेगळ्या वेळी ३२ हजार १३६ रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्ज तर मिळालेच नाही उलट त्याने आपला मोबाईल बंद करून संपर्क तोडला. 


आपली फसवणूक झाल्याचे आनंद कागळे याच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्या बँकेत जावून विचारणा केली. तर ज्या खात्यावर त्याने पैसे पाठविले होते ते खाते बंद झाल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्याने भोकर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगुन तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गौरव शर्मा या भामट्याविरुध्द फसवणुक व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक विकास पाटील करीत आहेत. 

निर्दयीपणे गायीची हत्या

नांदेड : शेताच्या आखाड्यावर बांधलेली २५ हजार रुपये किंमतीची गाय अज्ञातानी एका झाडाला बांधून तिची निर्दयी हत्या केली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. ही घटना मरखेल (ता. देगलुर) येथे गुरूवार (ता. दोन) रात्री घडली. 

मरखेल (ता. देगलूर) येथील हुलरेड्डी पुंडारेड्डी अर्धे (वय ६०) यांच्या शेतावर असलेल्या आखाड्यावर जनावरे बांधली होती. परंतु रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी आखाड्यावर बांधलेली गाय दाव्यासह (दोरी) सोडून काही अंतरावर नेले. तेथे एका लिंबाच्या झाडाला तिला बांधले. मारेकऱ्यांनी एवढेच नाही तर तिचे दोन्ही पाय व डोके एकत्र बांधून तिची निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर हे मारेकरी निघून गेले. गाय चोरुन नेण्याऐवजी तिची हत्या का केली याबाबत परिसरात उसटसुलट चर्चा सुरू आहे. ही बाब शुक्रवारी (ता. तिन) सकाळी उघडकीस आली. यानंतर हुल्लरेडी अर्धे यांनी मरखेल पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. हुल्लरेड्डी अर्धे यांच्या फिर्यादीवरुन मरफेल पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. कुंभारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT