Hingoli Lok Sabha constituency Sakal
मराठवाडा

Hingoli Lok Sabha constituency : हिंगोली मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात; १५ अपक्षांनी घेतली माघार

हिंगोली लोकसभा मतदार संघात छाननी नंतर ४८ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ( ता. ८) पंधरा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघात छाननी नंतर ४८ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ( ता. ८) पंधरा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये भाजपच्या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पेच निर्माण झाला होता. यापैकी दोघांनी अर्ज मागे घेतले आहेत.

दरम्यान, हिंगोली लोकसभेत ५५ उमेदवारांनी एकूण ७८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शुक्रवारी ता. पाच छाननीअंती सात जणांचे अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ४८ उमेदवार वैध ठरले होते.

सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंधरा जणांनी अर्ज मागे घेतले यामुळे आता ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे रामदास पाटील व धनेश्रर गुरू आनंद भारती यांनी अर्ज मागे घेतले तर शिवाजी जाधव यांचा अर्ज कायम आहे.

यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर, बहुजन समाज पार्टीचे गजानन डाळ, कम्युनिस्ट पार्टी आँफ इंडिया (मार्कसिस्ट) विजय गाभणे, शिवसेना (शिंदे गट) संभाराव उर्फ बाबुराव कदम,

अखिल भारतीय परिवार पार्टी अनिल मोहिते, इंडियन नँशनल लिग चे अल्ताफ अहेमद, बहुजन समाज पार्टी ( आंबेडकर) त्रिशला कांबळे, बहुजन मुक्ती पार्टी वर्षा देवसरकर, समनक जनता पार्टी देशा बंजारा, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (ए) प्रकाश रणवीर,

वंचित बहुजन आघाडी बाबु चव्हाण, अभिनव भारत जनसेवा पक्ष रवी जाधव, भीम सेना सुनील इंगोले, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी हेमंत कनाके, अपक्ष अशोक राठोड, अपक्ष आनंद धुळे, अपक्ष अंबादास गाडे, अपक्ष कदीर मस्तान सय्यद, अपक्ष गोविंद भवर, अपक्ष दता सुर्यवंशी, अपक्ष देवजी असोले, अपक्ष बाबुराव कदम,

अपक्ष महेश नप्ते, अपक्ष रवी शिंदे, अपक्ष रामप्रसाद बांगर, अपक्ष रामराव जुमडे, अपक्ष वसंत पाईकराव, अपक्ष अँड विजय राऊत, अपक्ष विश्वनाथ फाळेगावकर, अपक्ष शिवाजी जाधव, अपक्ष सर्जेराव खंदारे, अपक्ष सुनील गजभार, अपक्ष सतार पठाण यांचा समावेश आहे.

उमेदवारी मागे घेतलेल्या मध्ये अशोक ढोले, अशोक पाईकराव, प्रा. डॉ. आश्वीनीकुमार क्षीरसागर कोळीकर, गोविंद वाव्हळ, गंगाधर सावते, दिवाकर माने, धनेश्रर.गुरु आनंद भारती, नागोराव ढोले, नामदेव कल्याणकर, बाजीराव सवंडकर, मनोज देशमुख, राजु वानखेडे, रामदास पाटील, विवेक देशमुख, संजय राठोड यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

SCROLL FOR NEXT