Ambajogai Crime News sakal
मराठवाडा

Ambajogai Crime News : रोखपालास पिस्तूल लावून ३९ लाखाची रक्कम लुटली ; अंबाजोगाईत रात्री घडलेली घटना

(बातमीदार) शहरातील एका पतसंस्थेच्या रोखपालास रस्त्यात अडवून तीन जणांनी पिस्तूलचा धाक दाखवत ३९ लाख रुपयाची बॅग लंपास केली. शुक्रवारी (ता.१६) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई : (बातमीदार) शहरातील एका पतसंस्थेच्या रोखपालास रस्त्यात अडवून तीन जणांनी पिस्तूलचा धाक दाखवत ३९ लाख रुपयाची बॅग लंपास केली. शुक्रवारी (ता.१६) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.

घटनेची माहिती अशी, की येथील राजर्षी शाहू पतसंस्थेचे रोखपाल गणेश देशमुख हे शुक्रवारी रात्री आपले कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास ३९ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून निघाले होते.

ते मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना रस्त्यातो अडविले व स्वतः जवळील पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली. पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवत त्यांनी देशमुख यांच्याकडील रक्कम ठेवलेली बॅग घेतली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भर वस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

SCROLL FOR NEXT