मराठवाडा

हिंगोली : सिध्देश्वर धरणातून पुर्णा नदी पात्रात ३९,९९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग

औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले असुन धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले असुन धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सलग दुसऱ्या दिवशीही गुरुवारी ता. २३ दुपारी दिड वाजता धरणाच्या चौदा दरवाज्या पैकी बारा दरवाजे उघडले असुन पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरण शंभर टक्के भरले असून पाण्याची आवक बघता बुधवारी सकाळी धरणाचे बारा दरवाजे उघडून पुर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गुरुवारी देखील दुपारी दिड वाजता बारा दरवाजे उघडून पुर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

धरणाचे आज दुपारी दिड वाजता एकुण चौदा दरवाज्या पैकी बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये एक,दोन, तीन, चार,सहा, सात, आठ, नऊ, अकरा, बारा, तेरा व चौदा हे दरवाजे उघडून पाण्याचा पुर्णा नदी पात्रता विसर्ग केला जात आहे. दरम्यान मागच्या चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. आज सकाळी देखील पाऊस झाला होता. दरम्यान, सिध्देश्वर धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावरून पुर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT