4079 of polytechnic seats vacant in Marathwada sakal
मराठवाडा

Polytechnic Admission 2024 : मराठवाड्यात ६४ तंत्रनिकेतनमधील पॉलिटेक्निकच्या २३ टक्के जागा रिक्त

पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून शैक्षणिक सत्राला सुरवात झाली. मराठवाड्यातील ६४ तंत्रनिकेतनमधील १७ हजार ४२५ पैकी १३ हजार ३४६ जागा भरल्या गेल्या. तर, ४ हजार ७९ (२३.४१ टक्के) जागा रिक्त राहिल्या.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून शैक्षणिक सत्राला सुरवात झाली. मराठवाड्यातील ६४ तंत्रनिकेतनमधील १७ हजार ४२५ पैकी १३ हजार ३४६ जागा भरल्या गेल्या. तर, ४ हजार ७९ (२३.४१ टक्के) जागा रिक्त राहिल्या.

गेल्या वर्षीच्या प्रवेशाच्या तुलनेत १ टक्क्याने प्रवेशात वाढ झाली. मराठवाड्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या १० संस्थांमधील ९९.६१ टक्के जागा भरल्या गेल्या असल्याची माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक अक्षय जोशी यांनी दिली.

नियमित प्रवेशाच्या तीन आणि स्पॉट ॲडमिशनच्या फेऱ्या पूर्ण झाल्यावर ३ सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राला सुरवात झाल्याचे शासकीय तंत्रनिकेतचे प्रवेश समन्वयक राजेश आघाव यांनी सांगितले. ते म्हणाले, की यावर्षीही संगणक संदर्भातील कोर्सेसला अधिक पसंती होती.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश क्षमता मराठवाड्यात सर्वाधिक आहे. येथे नऊ शाखांत ६९० जागा आहेत. त्या १०० टक्के जागा भरल्या गेल्या. बीड, अंबड, जालना, नांदेडसह लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या १०० टक्के भरल्या गेल्या आहेत. धाराशिव येथे ९, हिंगोली येथे ४ तर जिंतूर येथे २ अशा १५ जागा शासकीय तंत्रनिकेतनच्या रिक्त राहिल्या आहेत.

अशी राहिली पसंती : संगणक, माहिती व तंत्रज्ञान, स्वयंचलित अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता विषयांना सर्वाधिक पसंती दिसली. स्थापत्य, यंत्र, विद्युत, अणुविद्युत, दूरसंचार या कोर्सेसच्या सर्वाधिक जागा रिक्त आहेत.

मराठवाड्यातील प्रवेशाची अशी आहे स्थिती

जिल्हा - महाविद्यालये - क्षमता - प्रवेश -रिक्त जागा - टक्केवारी

  • संभाजीनगर - १४ - ४४५५ - २६५१ - ८०४ - ८१.९५

  • बीड -११ -२७९० -२१८६ -६०४ -७८.३५

  • धाराशीव -५ -१०९०- ८२९ -२६१- ७६.०६

  • हिंगोली -२ -३३० -२६९- ३४- ८९.७

  • जालना- ६ -१५३०- ११६८ -३६२- ७६.३४

  • लातूर -१४ -३८३० -२७१५- १११५- ७०.८९

  • नांदेड- ८- २५००- १८३५- ६६५- ७३.४

  • परभणी- ४ -९०० -६६६ -२३४ -७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT