jalna jalna
मराठवाडा

जालन्यात कोरोना निर्बंध मोडणाऱ्या ४८ जणांवर गुन्हे दाखल

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधांची सर्रास पायमल्ली केली जात आहे

सकाळ वृत्तसेवा

जालना: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांची पायमल्ली करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ४८ व्यापाऱ्यांवर शुक्रवारी (ता.सात) सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. मात्र, पोलिस प्रशासन, नगरपालिका यांच्याकडून या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. परिणामी या कारवाईसह निर्बंध पालनाकडे अनेकांनी कानाडोळा केला आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेश लागू असताना अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सेवा पुरविणाऱ्या दुकाने सुरू ठेवलेल्या व्यापाऱ्यांसह सकाळी अकरानंतर सुरू ठेवलेल्या अत्यावश्‍यक सेवेची दुकाने उघडे ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारी (ता.सहा) सदर बाजार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतली तब्बल ४८ दुकान मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाले चित्र शहरात पाहण्यास मिळाले आहे.
दरम्यान ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रमेश रूपेकर, गणेश इलवार, नागनाथ भताणे, राजेंद्र वाघ, पोलिस कर्मचारी समाधान तेलंग्रे, परशुराम पवार, कैलास खार्डे, दीपक घुगे, कडुबा सोनुने, फुलचंद गव्हाणे, योगेश पठाडे, रमेश फुसे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, अशोक जाधव, राजू वाघमारे, महिला कर्मचारी कमल गिरी, सुमित्रा अंभोरे आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT