file photo 
मराठवाडा

हिंगोली औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५० कोटीची  तरतूद करावी - खासदार हेमंत पाटील

राजेश दारव्हेकर

हिंगोली  : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये  कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेस  प्रशासकीय मान्यता देऊन ५०  कोटी रूपायांची आर्थिक तरतूद करावी या याबाबत  राज्याचे उद्योग,खनिकर्म  मंत्री  सुभाष  देसाई यांची खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन मागणी केली. 

हिंगोली जिल्हा  उद्योगाच्या बाबतीत कात टाकत असून नवनवीन  उद्योग स्थापनेस उद्योगपती प्राधान्य देत आहेत.हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन २२ वर्षाचा कालावधी उलटून गेला असून सुद्धा अजून कोणाताही मोठा  उद्योग उभारला गेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण आहे. यासर्व बाबींचा अनुशेष दूर करण्यासाठी  खासदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्याच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर अनेक उदयोग उभारणीस चालना दिली. नुकतेच शेतमाल साठवणुकीसाठी  गोदामांची  आणि हळद बोर्डाच्या स्थापनेला मंजुरी   मिळाली आहे. 

नवनवीन  उद्योग स्थापन होत  असताना औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधांचा अभाव  दिसून येत आहे . उद्योगासाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध  करून दिल्या तरच उत्तम प्रकारचे उत्पादन होऊ शकते. वसाहतीमध्ये पाणीपुरवठा हि मूलभूत गरज असून याकरिता उद्योजकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मागण्या केल्यामुळे याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची मागणी केली.

तसेच या कामासाठी ५० कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात यावी असे हि खासदार हेमंत पाटील म्हणाले. औद्योगिक क्षेत्रात आज ५० % पेक्षा जास्त उद्योग केवळ कायमस्वरूपी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे बंद अवस्थेत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासात खीळ बसत आहे . ना उद्योग जिल्हा अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख बनत आहे. ही नकारात्मक ओळख पुसून टाकण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेत प्रशासकीय मान्यता मिळावी त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी  केली.यावेळी त्यांच्यासह नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT