मराठवाडा

कन्नड शहरात गळा आवळून एकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा

कन्नड, (जि. औरंगाबाद) : येथील माळीवाडा परिसरात राहणारे आप्पासाहेब श्‍यामराव गायकवाड (वय 50, मूळ रा. बोरसर, ता. कन्नड) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आली. आप्पासाहेब गायकवाड यांच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरून शकील शमीम शेख (रा. समर्थनगर, कन्नड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आप्पासाहेब गायकवाड यांच्या भावाचे निधन झाल्याने ते कुटुंबीयांसह बोरसर येथे गेलेले होते. गॅस सिलिंडर आणण्यासाठी बुधवारी (ता. 28) ते गल्लेबोरगाव येथे गेले होते; मात्र त्यांच्यासोबत असलेल्यांना त्यांनी "मी कन्नड येथे जाऊन येतो' असे सांगितले होते. त्यांच्यासोबत गेलेली व्यक्‍ती गॅस घेऊन परत बोरसरला गेली, तर आप्पासाहेब कन्नडला आले. मात्र रात्री ते परत घरी न आल्याने तसेच मोबाईल बंद असल्याने त्यांचे चुलतबंधू संजय गायकवाड हे कन्नड येथील माळीवाडा येथे आप्पासाहेब राहत असलेल्या ठिकाणी पोचले असता त्यांना घरात आप्पासाहेब निपचित अवस्थेत पडलेले दिसले. एकजण बाहेरच्या खोलीत झोपलेले आढळले. संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शकील शेख (रा. समर्थनगर) असे असल्याचे सांगितले. दरम्यान, संजय गायकवाड यांनी आप्पासाहेब यांच्या पत्नीस ही बाब सांगितली असता या व्यक्तीकडे आप्पासाहेब यांचे सात-आठ लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले. त्यामुळेच त्याने आप्पासाहेबांना मारले असावे, असा अंदाज असून, त्यानुसार संजय गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. 

याबाबत माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रेंगे, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य, कैलास करवंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आप्पासाहेब गायकवाड यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT