मराठवाडा

वसमत मतदारसंघाला विकासकामांसाठी ५१ कोटी; आमदार राजू नवघरे

हिवाळी अधिवेशनात मंजुरी

संजय बर्दापुरे

वसमत : वसमत मतदारसंघात विविध रस्ते व आदिवासी मुलामुलिंचे वसतिगृह व कर्मचारी निवासस्थानासाठी शासनाने ५१ कोटी रुपयांची मंजुरी हिवाळी अधिवेशनात दिली असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली.आमदार राजू नवघरे यांनी आजपर्यंतच्या आमदारकीच्या कार्यकाळात वसमत मतदारसंघातील विकासकामांसाठी सर्वाधिक निधी खेचून आणला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणुन रस्ते, पांदन रस्ते, धार्मिक स्थळे, सभागृह आदीचा विकास केला आहे.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजू नवघरे यांनी वसमत मतदार संघात विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. यामध्ये शिरडशहापुर येथील आदीवासी आश्रमशाळेच्या मुलांच्या वसतिगृह बांधकामासाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी तसेच रस्ते विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती आणि वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. यावेळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय पुरवणी मागणीत महाविकास आघाडी सरकारने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रस्ते विकासासाठी २१ कोटी तर शिरडशहापुर येथील आदीवासी आश्रमशाळेच्या मुलांच्या वसतिगृह बांधकामासाठी ३० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

रस्ते विकासामध्ये वाई,कुपटी,वापटी,बोल्डा (पांगरा शिंदे मार्ग) या ६ किलोमीटर रस्त्याची सुधारणा करणेसाठी ४ कोटी रुपये, टेंभुर्णी, हापसापुर, विरेगाव,दारेफळ,आडगाव,बोरी सावंत ते परळी या १७ किलोमीटर रस्त्याची सुधारणा करणेसाठी १० कोटी रुपये, परळी, तपोवन,करंजाळा,गुंडा,करंजी, दारेफळ,आरळ, तेलगाव ते रिधोरा या १८ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करणेसाठी ६ कोटी रुपयेचा समावेश असून एकूण विकासकामांसाठी ५१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली. आमदार नवघरे यांच्या कोट्यावधींच्या विकासकामांच्या धडाक्यामुळे वसमत मतदारसंघात नागरीकामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

Jarange Audio Clip: ''500 कोटींचं सोडा.. जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?'', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, जवळची माणसं फोडून...

Marathi News Live Updates:साताऱ्यात मतदानादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे समोरासमोर, हस्तांदोलनासह मिश्किल टोलेबाजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताय? चुकीचा रंग आणू शकतो गरिबी! घर रंगवताना नक्की पाळा वास्तूचे 'हे' नियम...

SCROLL FOR NEXT