Subsidy Sakal
मराठवाडा

Jalana News : जालना जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ५२ लाखांचे अनुदान

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून एक लाखाची मदत केली जाते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून निधीअभावी शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली नव्हती.

सकाळ वृत्तसेवा

जालना - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून एक लाखाची मदत केली जाते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून निधीअभावी शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली नव्हती. दरम्यान आर्थिक मदतीसाठी राज्यशासनाकडून आता ५२ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहेत.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात असमतोल पाऊस झाला. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती आणि पिकांना न मिळणारा भाव यामुळे शेतकरी आत्महत्या सुरू आहेत.

वर्ष २०२२ मध्ये जिल्ह्यात १२५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होता. तर यंदा मागील सात महिन्यात ३६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, मागील वर्षातील १८ व यंदा मंजूर झालेल्या २६ शेतकरी आत्महत्या प्रस्तावांसाठी निधी उपलब्ध नव्हता.

अखेर शासनाकडून पहिल्या टप्प्यात साडेसात लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ४४ लाख ५० हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ५२ लाखांचा निधी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसाठी उपलब्ध झाला आहे. मंजूर झालेल्या प्रस्तावांच्या वारसांना तहसील कार्यालयामार्फत निधी वाटप होणार आहे.

नऊ प्रस्तावांची चौकशी सुरू

जिल्ह्यात मागील सात महिन्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यांपैकी एक प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. तर २६ प्रस्ताव आर्थिक मदतीसाठी मंजूर करण्यात आले आहे. शिवाय नऊ प्रस्तावांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा! नियमित पावसाची दमदार एन्ट्री कधी? हवामान खात्याचा मोठा अंदाज

"तू नक्की २०० धावा करशील, फक्त..." आयपीएलचा बादशहा बनलेल्या वैभव सूर्यवंशीला ललित मोदींचा सल्ला, तू मोठा सेलिब्रिटी..

Graduate Youth News : D.Ed झालं, MPSC दिली, पण...; कायमस्वरूपी नोकरी आणि लग्न न ठरल्याने 38 वर्षीय पदवीधर युवकानं उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक

Video : कमळी पडणार हृषि सरांच्या प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "आमची अखेर प्रतीक्षा संपली.."

SCROLL FOR NEXT