money 
मराठवाडा

‘या’ जिल्ह्यात कर्जमाफीचे ५२१ कोटी हस्तांतरीत

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार ६४७ शेतकऱ्यांपैकी ७१ हजार ८७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची ५२१ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी, ग्रामीण बॅंका, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले अल्पमुदत पीककर्ज माफ होणार आहे. ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व ता. एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्जमाफ होणार आहे. कर्जमाफीत बसलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत दोन लाख १५ हजार आठ शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे.

एकूण ६८.७१ टक्के काम पूर्ण
एक लाख ४४ हजार ८६९ शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. अपलोड झालेल्या पैकी ८८ हजार २७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. एकूण ६८.७१ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर ७१ हजार ८७९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ५२१ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बहूतांस शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सध्या आधार केंद्र आणि आपले सेवा केंद्रावर गर्दी होत आहे.  

एक हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी
कर्जमाफी संदर्भात जिल्हाभरातील एक हजार १३० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यातील डीएलसीद्वारे केवळ १५ तक्रारींचे निवारण झाले आहे. त्यामुळे डीएलसीकडे ४९० तक्रारी प्रलंबित आहेत. तहसील स्तरावर १३४ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ४९१ तक्रारी प्रलंबित आहेत.

आधार प्रमाणीकरण करा
शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सेवा सरकार केंद्र, सीएससी केंद्रात कर्जमाफीचे खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आपल्या कर्जखात्याचा क्रमांक तपासून घेत क्रमांक चुकीचा असल्यास अमान्य हा पर्याय निवडावा. कर्जमुक्तीच्या यादीत मयत शेतकऱ्यांचे नाव असल्यास बॅंकेशी संपर्क साधून वारसाची नोंद घ्यावी. - मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, परभणी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? BJP आणि NCP च्या दोन बड्या नेत्यांमध्ये भेट; नव्या समीकरणांची चर्चा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची टीम आली अन् स्वीट होममध्ये आढळला मृत उंदीर; तात्काळ परवाना रद्द, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

जुई गडकरीने सुरू केलं नवं काम; अभिनयासोबत आता 'या' नव्या प्रवासालाही केली सुरुवात

Latest Marathi News Live Update: वेळ नदीला महापूर, पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाहतूककोंडी

SCROLL FOR NEXT