photo 
मराठवाडा

 ५८९ थकबाकीदार वीज ग्राहकांना दणका

संजय कापसे

कळमनुरी(जि. हिंगोली) : वीज वितरण कंपनीने ग्राहकाकडे असलेल्या वीज बिल थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम हाती घेतली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही वसुलीचे उद्दिष्ट देत उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या सहा दिवसांत ५९ लाख रुपयांची थकबाकी वसुली करीत ५८९ ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

कळमनुरी विभागातील ३ हजार ५४० ग्राहकांकडे एक कोटी चार लाख रुपये, आखाडा बाळापूर तीन हजार ९६८ ग्राहकांकडे एक कोटी ३६ लाख रुपये, नांदापूर एक हजार ६०१ ग्राहकांकडे ६८ लाख रुपये, एक वारंगा फाटा एक हजार ३९७ ग्राहकाकडे ४९ लाख रुपये, डोंगरकडा व जवळा पांचाळ विभागातील दोन हजार १९९ ग्राहकांकडे एक कोटी १७ लाख अशी एकूण सात कोटी ६७ लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे.

कर्मचाऱ्यांनाही धरले धारेवर 

थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम हाती घेतली असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने पहिल्यांदाच ग्राहकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीकरिता कर्मचाऱ्यांनाही धारेवर धरले आहे. दुसऱ्या बाजूला वीज थकबाकी वसुलीला प्रतिसाद न देणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तत्काळ खंडीत करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही आता या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

पाच कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट

या महिन्यात पाच हजार ९६१ ग्राहकांना संदेश पाठवून विजेची थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते. तालुक्यातील २४ हजार ८६१ वीज ग्राहकांपैकी थकबाकीदार असलेल्या ग्राहकांकडून थकबाकी वसुली करिता कळमनुरी व हिंगोली येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत थकबाकीदार वीज ग्राहकांकडून पाच कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील सहा दिवसांत पथकाने ५९ लाख रुपये थकबाकी वसुली करून वसुलीला प्रतिसाद न देणाऱ्या ५८९ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे.

मुदतीत वीज देयके भरावीत

वीज वितरण कंपनीने थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम हाती घेतली आहे. कर्मचाऱ्यांनाही वसुलीचे उद्दिष्ट देत जबाबदार धरल्या जात आहे. त्यामुळेच थकबाकीदार वीज ग्राहकांनी मुदतीत वीज देयके भरून सहकार्य करावे. सुट्टीच्या दिवसातही वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता एस. एस. रेकुळवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''आम्हाला बहीण-भाऊ म्हणू नका'', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? राजकीय संकेत काय?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Latest Marathi News Live Update : बीडच्या प्रभाग १६ मध्ये मतदान केंद्रासमोरच पैसे वाटप; VIDEO

Ajit Pawar : 'मिनी भारत' ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आवाहन

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मैदान गाजवले! अशक्य मॅच खेचून आणली, ११ चेंडूंत ५२ धावांचा पाऊस; टीम इंडियासाठी शुभ संकेत

SCROLL FOR NEXT