aurnagabad sakal
मराठवाडा

अतिवृष्टीने सहाशे पेक्षा जास्त हेक्टर जमिनीचे नुकसान

आतापर्यंत २८ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : खरिप हंगाम चांगला हाती लागेल अशी अपेक्षा वाढली असताना अतिवृष्टीने मराठवाड्यात कहर केला आणि हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास निसर्गाने हिरावून नेला. अतिवृष्टीने अंदाजे १४ लाख ६९ हजार हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे तर औरंगाबाद, जालना, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात ६१७. ३७ हेक्टर जमीन या पावसाने खरवडून नेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीने उडीद, मुग हातचे गेले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत मराठवाड्यात २८.५६ टक्के पंचनामे झाले आहेत.

मराठवाड्यात यंदा पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील पिकांचे नुकसान झले आहे बहूतांश भागातील उडीद, मुगांचे नुकसान झाले आहे. तर कपाशी व सोयाबीनवरील संकटाचे परिणाम दिसत आहेत. आता पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे काही प्रमाणात काढणी सुरू झालेल्या सोयाबीनसह कपाशीच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता बळावली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात जवळपास २० लाख २२ हजार ९३ शेतकऱ्यांच्या १४ लाख ६९ हजार ५५ हेक्‍टरवरील पीक अतिवृष्टीमुळे बाधित झाले. तर १२१३ शेतकऱ्यांची ६१७. ३७ हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ७७६ शेतकऱ्यांची ३६.५७ हेक्टर, जालना जिल्ह्यातील २२७ शेतकऱ्यांची१५०.४० हेक्टर, लातुर जिल्ह्यातील १९५ शेतकऱ्यांची ८९.९० तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांची ५० गुंठे जमीन खरवलून गेली आहे.

अतिवृष्टीने पिके हातची गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी २० सप्टेबरपर्यंत मराठवाड्यात जवळपास ४ लाख १९ हजार ५९४ हेक्‍टरवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी २८.५६ टक्‍के पंचनामे झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार नुकसान क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

जिल्हा ..........बाधित शेतकरी........... बाधित क्षेत्र

औरंगाबाद.......३२६९३५..............१७२०१५.१५

जालना... .......२६१९२८............. २२४६६६.६३

परभणी.......... २२२७९४............... १६१०२७

हिंगोली... ..........७६६६..............६८३४

नांदेड... ..........४५१५८८.............३७५१७३

बीड... ..........७३७२२५.............. ५१९४२५

लातूर... ...........८४९०............... ६४२२.६४

उस्मानाबाद.. ....५४६७..............३४९१.८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT