parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani News : जिल्ह्यात ६२.०५ टक्के पेरणी

सर्वाधिक सोनपेठ तालुक्यात रब्बी पेरणी क्षेत्राची नोंद

सकाळ डिजिटल टीम

परभणी : परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने ठप्प पडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. संपूर्ण जिल्हयात आतापर्यंत ६२.०५ टक्के पेरणी झाली असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. त्यात सर्वाधिक सोनपेठ तालुक्यात ८२.८४ टक्के पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने सुरवातीच्या काळात दडी मारल्याने पेरणीची कामे पूर्ण होऊ शकली नव्हती. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरण्या खोळंबल्या. जून ते ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या ६५ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले होते.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर पुन्हा अतिवृष्टीचे संकट उभे केले आहे. जवळपास ३२ महसुल मंडळात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम म्हणून अनेक शेतातील पिके नष्ट झाली. परंतु या पावसाने जमिनीतील ओलावा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी पेरण्या राहिल्या आहेत. त्या करून घेण्यास सुरवात केली आहे.

परभणी जिल्हयात रब्बीचे २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ६८ हजार ३१ हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. याची टक्केवारी ६२.०५ टक्के इतकी येते. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ६५ हजार १७

हेक्टरवर, गव्हाची ३९ हज रा ३०८ पैकी ११ हजार ८२२ हेक्टर, हरभरा १ लाख १२ हजार १७० पैकी ८९ हजार ३२२ हेक्टर, करडईची ३ हजार ३७१ पैकी १ हजार १८ हेक्टर, सूर्यफूलच चे २ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT