file photo 
मराठवाडा

लोअर दूधना प्रकल्प धरणात ७२ टक्के जलसाठा; उन्हाळ्यातील पिकांना धरणातील पाण्याचा मिळणार लाभ

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण तुडुंब भरले होते. धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातुन रब्बी हंगामातील पिकांना एप्रिल व मे महिण्यात दोन पाणी पाळ्या मिळणार असल्याने शेतकर्‍यांतुन समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण तब्बल दहा वर्षानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शंभर टक्के भरले. सद्य: स्थितीत धरणात ७२ टक्के इतका उपलब्ध जलसाठा आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या दोन्ही कालव्यातून यापुर्वी एक पाणी पाळी सोडण्यात आली होती. त्यामुळे धरणातील पाण्यामूळे शेतकर्‍यांच्या लाभ क्षेत्रातील तेरा हजार हेक्टर शेतीला लाभ मिळाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगलाच फायदा झाला. धरणाचा डावा कालवा हा ६९ किलोमीटर असून उजवा कालवा ४८ किलोमीटर आहे. या पाणी पाळीमुळे सेलू, जिंतूर, मानवत व परभणी तालुक्यातील शेतकर्‍यांना या पाण्याचा सिंचनासाठी लाभ मिळाला. त्याच बरोबर एप्रिल आणि मे महिण्यात धरणातुन दोन पाणी पाळ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण सुत्रांनी दिली आहे. तसेच उन्हाळ्यात सेलू शहर, आठ गाव पाणी पुरवठा योजना, मंठा शहर, परतुर शहर व मंठा, परतुर तालुक्यातील १७३ गावांना धरणातील पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे.

लोअर दुधना प्रकल्प धरण शंभर टक्के भरल्यामुळे यंदा रब्बी हंगामासाठी यापुर्वी एक पाणी पाळी सोडण्यात आली होती. उन्हाळ्यातील शेतकर्‍यांच्या पिकांसाठी पुन्हा दोन पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता सतिश बागले यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT