8 new case of COVID-19 in Umarga, District Latur 
मराठवाडा

उमरगा : आज पुन्हा आठ पॉझिटिव्ह; एकूण ८८ कोरोनाग्रस्त

अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद)  : शहरातील कोविड उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपासून प्रलंबित असलेले कोरोना चाचणीचे अहवाल मंगळवारी (ता. १४) सकाळी प्राप्त झाले. त्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये शहरातील सहा तर तुरोरी व गुंजोटी प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालु्क्यातील बाधितांची संख्या एकूण ८८ वर गेली आहे.

शहरातील कोविड उपजिल्हा रुग्णालयातून ११ ते १३ जुलै या तीन दिवसांत ८५ स्वबचे नमुने तपासणीस पाठविण्यात आले होते. मंगळवारी सकाळी प्रलंबित ६५ अहवाल आले. त्यापैकी आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील गुंजोटी येथील ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील तुरोरी येथील एक जण पॉझिटिव्ह तर शहरातील कोविड रुग्णालयातील मेडिसिन विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा, मूकबधिर शाळेच्या परिसरातील एक ज्येष्ठ महिला. ती पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. जकापूर कॉलनी येथील पूर्वीच्या बाधित सेवानिवृत्त शिक्षकाचा नातू, आरोग्यनगर येथील पूर्वीच्या रुग्णाच्या कुटुंबातील दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत तर शहरातील जुनापेठ येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक बाधित रुग्ण आढळून आला. 
 

शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, प्रशासनाकडून उपाययोजना व जनजागृती सुरू आहे; तरीही नागरिकांनी अशा स्थितीत स्वतःची काळजी घेण्याबरोबरच इतरामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. उमरगा शहरात नगरपालिकेच्या कॉम्पलेक्समध्ये फिवर क्लिनिक सुरू केले आहे, तेथे शहर व तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनी तपासणी करून घ्यावी. 
- विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT