Beed Accident  Sakal
मराठवाडा

बीड : ट्रक व जीपच्या भीषण अपघातात ७ ठार, १२ जखमी

जीपमधील सर्वजण आर्वी येथून कार्यक्रमासाठी निघाले होते. मृत लातूरच्या आर्वी व इतर गावातील रहिवासी

सकाळ डिजिटल टीम

अंबाजोगाई : लातूर अंबाजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी नजीक शनिवारी (ता.२३) सकाळी १० च्या सुमारास ट्रक आणि क्रुझरच्या भीषण अपघातात सात जण ठार, तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ३ जण गंभीर आहेत. घटनेतील जखमींवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतात पाच महिला, एक पुरूष आणि एका बालकाचा समावेश आहे. (Truck Jeep Accident In Beed)

या अपघातात निर्मला सोमवंशी (वय ३८), स्वाती बोडके (वय ३५), शकुंतला सोमवंशी रा.आर्वी (वय ३८), सरोजबाई कदम रा. मळवटी (वय ३७), चित्रा शिंदे रा.कासारखेडा (वय ३५), खंडू रोहिले रा. लातूर जीप चालक (वय ३०), ओळख न पटलेला बालक (वय ९) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, राजामती सोमवंशी (वय ५०), सोनाली सोमवंशी (वय २५), रंजना माने (वय ३५), परिमला सोमवंशी (वय ७०), दत्तात्रय पवार (वय ४०), शिवाजी पवार (वय ४५), यश बोडके (वय ९), श्रुतिका पवार (वय ६), गुलाबराव सोमवंशी (७५), कोमल जाधव (वय ३०), साक्षी जाधव (वय १६), प्रथमेश सोमवंशी (वय १४) सर्व रा. आर्वी (जि.लातूर) अशी जखमींची नावे असून, या सर्वांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राडी (ता.अंबाजोगाई) येथील उत्तमराव गंगणे यांच्याकडे शनिवारी मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील आर्वी व साई येथून त्यांचे नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अचानक अशी काळाने झडप घातलेल्या या घटनेत सात जण जागीच ठार झाले. परिसरातील नागरीक व पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तात्काळ स्वाराती रुग्णालयात पाठविले.

अरुंद रस्त्याचे बळी

बर्दापूर पर्यंत चौपदरी असलेला हा महामार्ग पुढे अरुंद आहे.. त्यामुळे मोठी वर्दळ असेलल्या या मार्गावर अनेकांचे बळी जात आहेत. अनेकदा मागणी करूनही या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. आणखी किती बळी गेल्यानंतर मार्ग निघेल, असा सवाल नागरिकांतून विचारल्यावर जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT