nanded sakal
मराठवाडा

Nanded News : जिल्हा, राज्य मार्ग, आदिवासी भागाकरिता ८५ कोटी रुपये

आमदार जवळगावकर यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

हदगाव : मतदारसंघात महत्वकांक्षी कामे मार्गी लागावी, दळणवळणाची व्यवस्था व्हावी याकरीता माझा प्रामुख्याने प्रयत्न असतोच, त्याच अनुषंगाने नागपूर पुरवणी अर्थसंकल्पात प्रमुख जिल्हा मार्ग राज्य मार्ग व आदिवासी भागाकरीता तब्बल ८५ कोटी रुपये मतदारसंघात आणले असल्याची माहीती आमदार जवळगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न असो वा दळवळणाचा तो प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहीला आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील १२३ गावाकरीता राज्यातील पाणीपुरवठ्याची सर्वात मोठी योजना आमदार जवळगावकर यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात आली.

राज्य मार्ग व जिल्हा मार्ग या रस्त्यांकरीता तालुक्यातील धानोरा फाटा ते हस्तरा २ कोटी ५० लक्ष, आष्टी तांडा पूल ते कांडली तीन कोटी ५० लक्ष, निवघा गावातील रस्त्याकरीता दोन कोटी ५० लक्ष, रुई ते मानवाडी या रस्त्याच्या कामाकरीता पाच कोटी पन्नास लक्ष, एकराळा या रस्त्याच्या कामाकरीता तीन कोटी ५० लक्ष, तसेच एकराळा ते कृष्णापुर, रावणगाव या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तीन कोटी ५० लक्ष, निवघा ते कोहळी फाटा तीन कोटी ५० लक्ष, पांगरी फाटा ते पांगरी चार कोटी, सब स्टेशन ते पांगरी एक कोटी ७५ लक्ष, मानवाडी येथील रस्त्यासाठी दोन कोटी, काळेश्वर ते उंचेगाव भाग एक तीन कोटी ५० लक्ष, काळेश्वर ते उंचेगाव भाग दोन, दोन कोटी पन्नास लक्ष, मतदारसंघातील बोरगडी ते हिमायतनगर पाच कोटी असा विविध रस्त्यांसाठी निधी आणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Aqua Line: मुंबईमध्ये धावत्या भूमिगत मेट्रोत उडाल्या ठिणग्या; प्रवाशांत घबराट अन्...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

SCROLL FOR NEXT