Social Work  Sakal
मराठवाडा

Inspiration Story : वधू-वर पित्यांना कर्जबाजारी होण्यापासून ‘तो’ रोखतो, शिवजयंती समाजसेवेद्वारे साजरी

Community Service : शिवजयंती फक्त उत्सव म्हणून नाही, तर समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरी झाली पाहिजे, असा संदेश पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिला.

कमलेश जाब्रस

कमलेश जाब्रस

माजलगाव : शिवजयंती साजरी करायची असेल तर लोकांना दिलासा मिळेल अशा उपक्रमांनी करा. शिवरायांचे तेच विचार आहेत. ज्यावेळी असा कार्यक्रम तुम्ही घ्याल त्याच वेळी मी माजलगावला येईन.’ या पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शब्दांनी युवकाच्या मनात जिद्द पेटली. त्यातून त्याने शिवजन्मोत्सवाचा सोहळा हा फक्त आणि फक्त सामाजिक उपक्रमांनीच साजरा करण्याचे ठरवले. त्यातून आजपर्यंत ५७३ बहिणींचे त्याने लग्न लावून दिले.

बाळू ताकट हा माजलगाव येथील ३२ वर्षीय युवक. शेतकरी कुटुंबातील ताकट यांचे वडील हे आडत व्यवसायही सांभाळत होते. सामाजिक जाणीवांची पार्श्वभूमी अन् बीकॉम शिक्षीत असलेल्या बाळूने १३ वर्षांपूर्वी मित्रमंडळींसह शिवजयंती उपक्रम साजरा करण्यास प्रारंभ केला. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी आदर्श ग्राम हिवरेबाजार येथील पोपटराव पवार यांची भेट घेतली व त्यांना कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

मात्र, पवार यांनी जेव्हा तुम्ही लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होणारे उपक्रम आयोजित कराल तेव्हा येईन, असे सांगीतले. तेव्हापासूनच बाळू ताकट हे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत गरजू उपवर-वधुंच्या रेशीमगाठी जुळवून देतात. यासह वधु-वरांना दीड लाख रूपयांपर्यंत संसारोपयोगी साहित्यही दिले जाते. यंदा या विवाह सोहळ्याचे १३ वे वर्ष असून यंदाच्या सोहळ्यात २१ दांपत्य रेशीमगाठीत अडकणार आहेत.

आतापर्यंत ५७३ जणांचे विवाह त्यांनी लावून दिले आहेत. बुधवारी सायंकाळी माजलगाव येथे यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा पर पडणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात बहुतेक शेतकरी आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे होतात. शेतात पिकलेल्या मालाला भाव न मिळाल्यास मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करायचा ही विवंचना त्यांच्यापुढे असते. त्यामुळे सामुदयिक विवाह सोहळ्यातून अशा शेतकरी व गरजू कुटुंबातील वर आणि वधु पित्याचा कर्जबाजारीपणा बाळूमुळे टळतो आहे.

अठरापगड जमातींचा सहभाग

बाळू ताकट यांच्यावतीने आयोजित विवाह सोहळ्यात सर्वधर्मीयांचा सहभाग असतो. आतापर्यंत झालेल्या ५७३ विवाहांत अठरापगड समाजातील उपवर मुला-मुलींच्या कुटुंबीयांचा खर्च त्यांनी वाचविला आहे. शिवरायांच्या विचारांचा आदर्श जपत असल्याचे समाधान वाटते असे बाळू ताकट सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT