Beed Crime News sakal
मराठवाडा

Beed Crime News : आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर जमावाचा हल्ला; केज शहरातील घटना

लोखंडी रॉड व दगडाने वाहनाच्या काचा फोडून पोलीसांना मारहाण ,एका गुन्ह्यातील आरोपीला पोलीस वाहनातून घेऊन जात असताना जमावाने पाठलाग करून पोलीस वाहन अडवून दगड व लोखंडी रॉडने हल्ला करून वाहनाच्या काचा फोडल्या व त्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवार (ता.१६) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी चौकात घडली.

सकाळ वृत्तसेवा

केज : एका गुन्ह्यातील आरोपीला पोलीस वाहनातून घेऊन जात असताना जमावाने पाठलाग करून पोलीस वाहन अडवून दगड व लोखंडी रॉडने हल्ला करून वाहनाच्या काचा फोडल्या व त्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवार (ता.१६) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी चौकात घडली. या प्रकरणी नऊ जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर, प्रविण इंगळे व पोलीस शिपाई कुलदिप घोळवे हे स्कार्पिओ (एमएच-१६/सीव्ही-५५५५) या वाहनाने केज शहरात आले. त्यांनी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना सोबत घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या प्रतिक भैरवनाथ चाळक याला तपासकामी ताब्यात घेण्यासाठी लव्हूरी येथे गेले होते.

त्यावेळी प्रतिक चाळक हा इतरांसोबत एका वाहनाच्या बॉनेटवर केक ठेवून कोणाचा तरी वाढदिवस साजरा करीत होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जामखेड पोलीसांनी त्यांच्या खाजगी वाहनाने प्रतीक चाळक यास घेऊन निघाले. त्यावेळी वीस-पंचेवीस जणांनी स्कॉर्पिओ (एमएच-४४झेड-२३००) या वाहनाने पाठलाग करत पोलीसांच्या वाहनास केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहन आडवे लावून अडविले.

कांही क्षणातच त्या जमावातील एकाने हातातील लोखंडी रॉड व दगड पोलीसांच्या वाहनावर मारून काचा फोडल्या. त्यानंतर पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांच्या गच्चीला धरून मारहाण केली. तसेच पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर यांना चापटाने मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रतिक चाळक यास पोलीस वाहनातून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

त्याबरोबर पोलीस शिपाई कुलदीप घोळवे यांनाही चापटाने मारहाण करून पोलीसांच्या खाजगी वाहनाचा चालक विशाल कांबळे यालाही बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतू त्या चालकाने मोठ्या शिताफीने त्यांचे वाहन पुढे घेत केज पोलीस ठाण्यात घेऊन गेला.

त्यानतंर पोलीस हवालदार बेल्हेकर यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहीत चाळक, व मुन्ना बचाटे (सर्व रा. लव्हूरी ता. केज) व अनोळखी तिघे अशा नऊ जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत. कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भर दिवसा शहरातील ठाण्याच्या‌ हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात मारहाणीच्या घटनेवरून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याची चर्चा शहरातील नागरिकांत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT