Burning The Car  ESAKAL
मराठवाडा

Burning The Car : चालत्या कारने घेतला पेट; आगीत कार जळून खाक

केज-कळंब रस्त्यावरील घटना, जीवितहानी टळली

रामदास साबळे

केज : चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (ता.०१) रात्री उशीरा केज-कळंब रस्त्यावरील केज शहरापासून चिंचोलीमाळी फाट्याजवळील पोदार इंग्लिश स्कूलच्या समोर घडली. परंतू चालत्या कारला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच कार रस्त्याच्या कडेला उभी करून कारमधून प्रवास करणारे सर्वजण बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे.

तालुक्यातील टाकळी येथील राजेश घुले हे सोमवारी रात्री पुणे येथून कारने आपल्या गावी टाकळी येथे येत होते. रात्री उशीरा ते केज शहराजवळ पोतदार इंग्लिश स्कूल समोर आले असता त्यांना कारच्या समोरील भागातून धूर निघत असल्याचे व काहीतरी जळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या ताब्यातील कार रस्त्याच्या कडेला घेऊन उभी केली.

खाली उतरून पाहीले असता कारने अचानक पेट घेतला. कांही क्षणातच पहाता-पहाता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली. कारचालकांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र कार जळत असल्याचे पाहून अनेकांनी वाहने उभी केल्याने घटनास्थळी गर्दी होऊन काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT