a record of Kunbi found in Wadiwagholi Maratha and Kunbi are one Inspection of three lakh records to Latur Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : वाडीवाघोलीत सापडली ‘कुणबी’ची नोंद

‘मराठा अन् कुणबी एकच’ दाव्याला बळ; लातूरला तीन लाख अभिलेखांची तपासणी

विकास गाढवे

लातूर : अंतरवाली सराटी येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली, शैक्षणिक व अन्य अभिलेखांमध्ये कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी जातीच्या नोंदीचा शोध सुरू केला आहे. जिल्ह्यात ९४६ पैकी वाडीवाघोली (ता. लातूर) गावात ‘कुणबी’च्या ४५ नोंदी आढळल्या आहेत.

१९५५-५६ मधील `क-ड` पत्रकावर या नोंदी असून दोन शेतकऱ्यांची नावे सन १९५१ च्या जनगणना रजिस्टरमध्ये आढळली असून तिथे त्यांच्या जातीची नोंद ‘मराठा’ आहे. यावरून मराठा व कुणबी एकच असल्याच्या व कुणबी म्हणजे मराठा समाजातील शेती करणारेच आहेत, या दाव्याला बळ मिळाले आहे.

नोंदी शोधासाठी जिल्हा प्रशासनाने दोन लाख ८१ हजार ६५६ अभिलेखांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंतच्या शोधानुसार वाडीवाघोली येथील १९५५-५६ च्या क-ड पत्रकात कुणबीच्या ४५ च्या नोंदी आढळल्या. जिल्ह्यात केवळ एकाच गावात या नोंदी आढळल्या असून याच गावाच्या १९५१ जनगणना रजिस्टरमध्ये मात्र, मराठा जातीच्या नोंदी आहेत.

यात क-ड पत्रकात कुणबी असलेल्या दोघांची जात जनगणना रजिस्टरमध्ये मराठा आढळली असून उर्वरित ४३ जणांच्या नावाचा उल्लेख जनगणना रजिस्टरमध्ये नसल्याचे लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांनी सांगितले. यावरून मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

क-ड पत्रकात नाव व वडिलांच्या नावासमोर जातीची नोंद असते. क-ड पत्रक म्हणजे सध्याचा आठ अचा उतारा होय. त्यात गावच्या शिवारात असलेल्या जमिनींची एकत्रित माहिती आहे. यामुळेच शेती असलेला मराठा म्हणजे कुणबीच असल्याचेही समर्थन करणे शक्य झाले आहे. जुन्या अभिलेखांत शेती असलेल्यांच्या जातीच्या नोंदी दिसत असून मजूर व भूमिहिनांच्या जातीच्या नोंदी कुठेच नसल्याचे मोठी उणीव दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT