Beed sakakl
मराठवाडा

Beed News : जुन्या भांडणाचा मनात राग धरून केजमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथील अभिषेक दातार या तरुणाचे मागील दोन महिन्यांपूर्वी गावातील आशिष किसन मस्तूद, अभिषेक बारीकराव चंदनशिव, प्रतीक तुकाराम शिंदे व आविष्कार अशोक उघडे यांच्यासोबत बोलण्यावरून वाद, हाणामारी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

केज : जुन्या भांडणाचा मनात राग धरून एका अठरावर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता.१३) उत्तरेश्वरपिंपरी येथे घडली. जखमी अभिषेक महादेव दातार (वय १८) या तरुणावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी रविवार (ता.१४) रोजी सात जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथील अभिषेक दातार या तरुणाचे मागील दोन महिन्यांपूर्वी गावातील आशिष किसन मस्तूद, अभिषेक बारीकराव चंदनशिव, प्रतीक तुकाराम शिंदे व आविष्कार अशोक उघडे यांच्यासोबत बोलण्यावरून वाद, हाणामारी झाली होती. त्यानंतर सरपंचासह ग्रामस्थांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद ग्रामपंचायतीत मिटविला होता. या भांडणाचा मनात राग धरून अभिषेकला गावातून जाता-येता शिव्या देणे, अंगावर थुंकणे असे प्रकार सुरू होते.

त्यातच शुक्रवारी (ता.१२) रोजीही गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे शेतात क्रिकेट खेळत असताना प्रतीक शिंदे याने आमच्या दारात क्रिकेट कशाला खेळतो, असे म्हणत शिवीगाळ केली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी अभिषेक हा झोपला असता अभिषेक चंदनशिव याचा केवड येथील मित्र रोहन सुदाम गवळी याने दोन-तीन वेळा फोन करून तू बाहेर ये, तू अभिषेकला नडतो, तुला आज फोडतो, तुझा मर्डरच करतो. अशी धमकी देत घराबाहेर बोलावले. त्याने घराबाहेर जाऊन पाहिले असता आशिष मस्तूद, अभिषेक चंदनशिव, प्रतीक शिंदे, आविष्कार उघडे, अभिषेक अनंत चंदनशिव, रोहन गवळी, अमर तुपारे हे रस्त्यावर थांबले होते.

त्यांच्या हातात धारदार कत्ती, चाकू हे पाहून तो घाबरून पळू लागला. याचवेळी आशिष मस्तूद याने जिवे मारण्याच्या उद्देशाने अभिषेक दातार याच्या डोक्यात कत्तीचा वार केला. तुला आज जिवंत सोडणार नाहीत, असे म्हणत अभिषेक चंदनशिव याने चाकूसारख्या धारदार हत्याराने डोक्यावर वार केला. वार चुकविण्यासाठी हात आडवा केल्याने अंगठ्याला व करंगळीजवळच्या बोटाला जखम होऊन रक्तस्राव होऊ लागला.

रोहन गवळी याने दुचाकीला अडकविलेला लोखंडी रॉड काढून त्याच्या छातीवर मारल्याने तो खाली पडला. त्यानंतर सर्वांनी त्याच्या छातीवर, पोटावर दगड मारले. मारहाण होताना ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची आई व ग्रामस्थांनी भांडण सोडविले. तोपर्यंत तो चक्कर येऊन बेशुद्ध झाला.

त्या जखमी तरुणावर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान १४ जानेवारी रोजी शुद्धीवर आल्यावर अभिषेक दातार याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आशिष मस्तूद, अभिषेक चंदनशिव, प्रतीक शिंदे, आविष्कार उघडे, अभिषेक अनंत चंदनशिव, रोहन गवळी व अमर तुपारे या सात जणांविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रोहन गवळी याला एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातून ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इतर सहा जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT