file photo 
मराठवाडा

अबचलनगर परिसर कंटेनमेंट झोन जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने नांदेड शहरात अबचलनगर भागातील ४४ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल रविवारी (ता. २६) पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णावर विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. यामुळे शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन जाहीर करुन सील करण्यात आला आहे. या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 
 
पोलिस तसेच वैद्यकीय पथक तैनात
अबचलनगर भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे आणि अत्‍यंत आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

पाच दिवसानंतर दुसरा रुग्ण सापडला
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धस्तरावर तयारी केली होती. त्याला यश आले होते, मात्र बुधवारी (ता. २२) पिरबुऱ्हाणनगरमध्ये ६४ वर्षीय पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यानंतर पिरबुऱ्हाणनगरसह त्या भागातील लगतच्या भागाला कंटेनमेंट झोन जाहीर करुन त्या भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यानंतर कोरोनाच प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन खबदारी घेत असताना रविवारी (ता. २६) शहरातील अबचलगनरमधील एक ४४ वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे प्रशासनाने नागरिकांना घरीच राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये
जिल्ह्यात रविवारपर्यंत (ता. २६) घेण्यात आलेल्या ६४९ स्वँबपैकी दोन रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आढळला आहे. यातील पहिला बाधीत रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल आहे. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण ८० व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परंतु दुसरा कोरोना रुग्णाचा स्वॅब पाझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन झाली आहे. जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका, असे आवाहन जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपवर थेट इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT