मराठवाडा

Loksabha 2019: सत्तार-पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

सकाळन्यूजनेटवर्क

औरंगाबाद - काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या भेटीने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

2019 लोकसभेच्या निवडणूकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून उमेदवार राजकीय व्यूहरचना करण्यात व्यस्त झाले असतानाच या भेटीने औरंगाबाद लोकसभा मतदार संघात नवी समीकरणे जुळणार का या चर्चांना उधाण आले आहे. अब्दुल सत्तार आणि विनोद पाटील यांच्यात तब्बल दोन तास पाटील यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकी संदर्भात खलबते झाली.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तो पर्यंत कुठलीही राजकीय निवडणूक न लढविण्याची प्रतिज्ञा विनोद पाटील यांनी केलेली असल्यामुळे ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात वा कोणाला पाठिंबा देतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष विनोद पाटील यांच्याकडे लागलेले आहे. या वेळी मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख, राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष दत्त भांगे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT