Abhimanyu Pawar esakal
मराठवाडा

आघाडी सरकारचे षडयंत्र सर्वोच्च न्यायालयाने उधळले - अभिमन्यू पवार

आघाडी सरकारने षडयंत्र रचत भारतीय जनता पक्षाच्या आम्हा १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित केले होते.

सकाळ वृत्तसेवा

औसा (जि.लातूर) : सभागृहात गोंधळ घातला म्हणून महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) भाजपच्या बारा आमदारांचे गेल्या वर्षी निलंबन केले होते. त्या विरोधात भाजपच्या या बारा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचा निकाल नुकताच लागला असून माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द केल्यावर औशाचे भाजप (BJP) आमदार अभिमन्यु पवारांनी (Abhimanyu Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, न्यायालयाने आघाडी सरकारचे हे षडयंत्र उधळून लावले. आघाडी सरकारने षडयंत्र रचत भारतीय जनता पक्षाच्या आम्हा १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित केले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने आमचे निलंबन रद्द केले आहे. यापूर्वीच न्यायालयाने १२ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय असंवैधानिक असून या संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का पोहोचवणारा तसेच आमदारांना नाही तर मतदारसंघातील जनतेला शिक्षा देणारा हा निर्णय आहे, अशा शब्दांत आघाडी सरकारवर ताशेरे ओढले होते. (Abhimanyu Pawar Welcome Judgment Of Supreme Court On 12 BJP Suspended MLAs)

मागच्या दाराने सत्ता मिळवून ती असंवैधानिकपणे राबविण्याच्या आघाडी सरकारच्या प्रयत्नांना हा मोठा धक्का आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आणि आमच्या अधिकारांचे रक्षण केल्याबद्दल विनम्रतापूर्वक आभार ! न्यायालयाचा आजचा निर्णय हा लोकशाहीला मार्गदर्शक व दिशादर्शक ठरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'सकाळ'कडे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT