file photo 
मराठवाडा

घृणास्पद : बालगृहातील युवतीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एका खून प्रकरणात बालगृहात शिक्षा भोगत असलेल्या एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार रविवारी (ता. एक) मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शहराच्या तेहरानगर येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसह तिच्या नातेवाईकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात या मुलीला एका बालगृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान याच भागातील रहिवासी असलेला अशरफखान परवेजखान याने सदर अल्पवयीन मुलीस चार महिन्यांपूर्वी स्वतः च्या घरी बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यामध्ये मुलगी गरोदर राहिली.

शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार, बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियमसह अनुसूचीत जाती- जमाती अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) अभिजित फस्के करत आहेत.

डॉ. करुणा जमदाडे यांच्या 'ऊर्जा' ग्रंथाचे प्रकाशन

नांदेड : येथील लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. करुणा जमदाडे यांच्या 'ऊर्जा' या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवारी (ता. एक) मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुसुम सभागृहात शंकर साहित्य दरबारच्या भव्य साहित्यसोहळ्यात संपन्न झाला.

नांदेडच्या इसाप प्रकाशनाने प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, प्रसिद्ध कवी आ. लहू कानडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले- पाटील कवयित्री अनुराधाताई पाटील, माजीमंत्री डी. पी. सावंत आदींची उपस्थिती होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT