Crime Esakal
मराठवाडा

Majalgaon Crime : चिमुरडीवर अत्याचार; शाळेतील नराधम शिक्षकास अटक

माजलगाव येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी रविवारी (ता. सहा) अटक केली आहे.

पांडुरंग उगले

माजलगाव - येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी रविवारी (ता. सहा) अटक केली आहे. राहुल अंबादास वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.अहील्यानगर) असे आरोपीचे नाव असून त्यास न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान संस्थाचकाकासह आरोपीला कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी माजलगाव बंदचे आवाहन केले आहे.

बदलापूरप्रमाणे राज्यात शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच असून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान घडली.

या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी (ता. चार) अज्ञात व्यक्ती विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

माजलगाव शहरातील मंजरथ रोडवरील एका शाळेत बालवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले मुली शिक्षण घेतात, परिसरातीलच एक साडेपाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते. तिला शाळेतील एका अज्ञात इसमाने ता.२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान डबा खाल्यानंतर अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडल्यानंतर तिच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आले.

घरी आल्यावर तिने शाळेत घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगून, पांढरे कपडे घातलेला माणसाला मी ओळखते असेही सांगितले. या घटनेनंतर चिमूरडीच्या पालकांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गून्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू, पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्ही ची तपासणी केली. त्या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली.

त्या सर्व शिक्षकांचे फोटो त्या अल्पवयीन चिमुरडीला दाखवल्यानंतर तिने आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे यास तत्काळ अटक केली आहे. दरम्यान या आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायदंडाधिकारी श्री. धर्माधिकारी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उद्या माजलगाव बंद, मोर्चा

अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणाचे आता तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. या घटनेचा सखोल तपास करून यात सहभागी असलेल्या संपूर्ण आरोपींना व संस्थाचालकांना कडक शासन करण्यात यावे, यासाठी माजलगाव शहरवासीयांतर्फे सोमवारी (ता. सात) माजलगाव शहर बंद ठेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हनुमान चौक भागातून हा मोर्चा शहर पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे निवेदन नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात देण्यात दिले आले. या निवेदनावर सुरेंद्र रेदासनी, कल्याण आबुज, रत्नाकर कुलथे, विलास नेमाने, रामराव दहिवाळ, गजानन बोकन, राजेंद्र टाक, वैजनाथ दहिवाळ, शशिकांत डहाळे, गणेश शहाणे, अजय दहिवाळ, अक्षय आंबिलवादे, लक्ष्मीकांत रामकरण कुलथे,अनिकेत आंबीलवादे, मोहित दळवी, रामेश्वर कुलथे, विजयप्रकाश कुलथे, विकास उदावंत, राजू उदावंत, नारायण सातपुते आदींसह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये टॅक्सीची तोडफोड

SCROLL FOR NEXT