acb acb
मराठवाडा

Breaking|जालन्यात लाचखोर डीवायएसपी एसीबीच्या जाळ्यात

डीवायएसपी सुधीर खिरडकर याच्यासह दोन पोलिस कर्मचारी ताब्यात

उमेश वाघमारे

जालना: ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जालना उपविभागीय पोलिस अधीक्षक सुधीर खिरडकर याच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना गुरूवारी (ता.२०) ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

तक्रारदार यांच्यावर काही दिवसांपूर्वी तालुका जालना पोलिस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधीकारी सुधिर खिरडकर यांच्या होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तब्बल पाच लाखांची लाच मागण्यात आली. याप्रकरणी तडजोतीअंती तीन लाख रूपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदार यांनी या प्रकरणी पुणे लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पुणे येथून एक पथक जालना शहरात दाखल झाले.

या पथकाने दोन दिवस या तक्रारीची पडताळणी करून खात्री केली. त्यानंतर गुरूवारी (ता.२०) पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कदीम जालना पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी संतोष निरंजन अंभोरे याला पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या आवारात दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तसेच संशयित उपविभागीय पोलिस अधीकारी सुधिर अशोक खिरडकर, पोलिस कर्मचारी विठ्ठल पुंजाराम खार्डे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधीकारी सुधीर खिरडकर याची चौकशी सुरू असून या प्रकरणी अद्यापि गुन्हा दाखल झालेला नाही.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकातील पोलिस उपअधीक्षक वर्षांराणी पाटील, पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर, कर्मचारी नवनाथ वाळके, किरण चिमटे, दिनेश माने यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT