ACB detained police sub-inspector along with a constable for taking bribe  
मराठवाडा

Latur Crime : शेतकऱ्यांकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलं! पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार ACBच्या ताब्यात

गुन्ह्याच्या कामात मदत करून अटक न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदारांने २० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

चाकूर, ता. ६ (बातमीदार) : शेतातील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्ह्याच्या कामात मदत करून अटक न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदारांने २० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. यात गुरूवारी (ता.६) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून पोलिस हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे तर पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे.

शेतातील सामायिक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भावकितील व्यक्तींची भांडणे झाली होती. यात परस्परविरोध तक्रारीवरून दोघांविरूध्दही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २५ वर्षीय तक्रारदार व त्याच्या वडीलांना सदर गुन्ह्याच्या तपास कामात मदत करून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिस हवालदार पांडुरंग दाडगे व पोलिस उपनिरीक्षक दिलीप मारे यांनी २५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

मंगळवारी (ता.४) शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पोलिस हवालदार दाडगे यांने तक्रारदारांकडून तडजोडीअंती २० हजार रूपये स्विकारण्याचे मान्य केले त्यास पोलिस उपनिरीक्षक मोरे यांनी लाच देण्यास प्रोत्साहन दिले.

गुरूवारी (ता. ६) दुपारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय पंचासमक्ष २० हजार रूपये स्विकारताना पोलिस हवालदार पांडुरंग दिगंबर दाडगे (वय ४३) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रकमेसह ताब्यात घेतले. तसेच पोलिस उपनिरीक्षक दिलीप रघुत्तमराव मोरे यास चाकूर पोलीस ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत चाकूर पोलिसात गुन्हा दाखल केला जात आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपअधिक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, फारूक दामटे, भागवत कठारे, भिमराव आलुरे, शाम गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT