Accident Sakal
मराठवाडा

जालना : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; एकजण ठार

महामार्गावर वाहन चालकांसाठी गतिरोधक, दिशादर्शक फलक नसल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे.

बाबासाहेब गोंटे

अंबड,जि.जालना : अंबड-जालना महामार्गावरील मठपिंपळगाव फाट्यालगत असलेल्या मत्स्योदरी शाळेजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील शेवगा येथील सोपान आसाराम बोंगाने व ज्ञानेश्वर कारभारी नागरे हे दोघे दुचाकी वरून जालनाकडून-शेवग्याकडे जात असताना मठपिंपळगाव फाट्यालगत असलेल्या मत्स्योदरी शाळेसमोर त्यांच्या दुचाकीला शनिवारी (ता.29) रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान जोराची धडक दिली.

यामध्ये सोपान आसाराम बोंगाने (वय 35) वर्षे हा जागीच ठार झाला आहे. तर ज्ञानेश्वर कारभारी नागरे (वय 29) वर्षे हा अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

सोपान बोंगाने यांच्या अपघातातील निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शेवगा, हारतखेडा, मठपिंपळगाव, गोलापांगरी, गोलासह परिसरातील ग्रामस्थ, व्यवसायिक घटनास्थळी मदतीसाठी धावले. सोपान बोंगाने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा पाच वर्षाचा मुलगा, एक तीन वर्षाची मुलगी, आई असा परिवार आहे.

अंबड-जालना महामार्गावरील गोलापांगरी, मठपिंपळगाव, शेवगा, हारतखेडा, शेवगा, कर्जतफाटाश परिसरात सतत अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या महामार्गावर वाहन चालकांसाठी गतिरोधक, दिशादर्शक फलक नसल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीचे बिहार कनेक्शन; मास्टरमाईंडच्या पत्नीला पाटण्यातून अटक

Lonavala Heavy Rain : चोवीस तासांत १३१ मिमी पाऊस; लोणावळ्यात जोरदार पावसाने सखल भाग जलमय

FIFA World Cup 2026 : पैशाने नाही विकत घेता येत गुणवत्ता; वर्ल्डकप फुटबॉलमधील सौदी, कतारच्या अपयशानंतर अधोरेखित

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी ४ वाजता सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT