Electric-Poll
Electric-Poll 
मराठवाडा

कुणीतरी बघतंय अपघाताची वाट!

अनिल जमधडे

औरंगाबाद - शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणानंतर शेकडो वीजखांब रस्त्यात आलेले आहेत. अपघाताची प्रतीक्षा करणाऱ्या या खांबांकडे महापालिका साफ दुर्लक्ष करीत असल्याने मोठ्या अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहरात विविध रस्त्यांवर शेकडो वीजखांब रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. रस्ता रुंदीकरणानंतर विद्युतखांब रस्त्याच्या कडेला शिफ्ट करून घेण्याची जबाबदारी मनपाची आहे. पण, यासाठी निधी नसल्याचे कारण सांगत महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. खांब शिफ्ट करून घेण्यासाठी महापालिकेने महावितरणकडे आवश्‍यक निधी भरणे आवश्‍यक आहे. लघुदाब वाहिनीचा खांब शिफ्ट करण्यासाठी साधारण दहा ते पंधरा हजार रुपये आणि उच्चदाब वाहिनीचा खांब शिफ्ट करण्यासाठी पंचवीस ते तीस हजारांचा खर्च येतो. हा खर्च महावितरणकडे भरल्यानंतर महावितरण निविदा काढून खांब शिफ्ट करून देते. 

शंभरावर खांबांना वळसा घालून वाहतूक 
तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी अनेक रस्त्यांचे रुंदीकरण केले. मात्र, त्यावेळी रुंदीकरणामुळे वीजखांब रस्त्यात आले आहेत. त्यातील काही महापालिकेने शिफ्ट करून घेतले, तरीही अंदाजे शंभरावर खांब तसेच रस्त्यात आहेत. त्यांना वळसा घालून वाहनांची दिवसरात्र वाहतूक सुरू असल्याने जीवित हानी होण्याची शक्‍यता आहे. 

पुनरावृत्ती नको 
सेंट्रल जकातनाक्‍याजवळ गेल्या आठवड्यात उच्चदाब वाहिनीच्या खांबाला ट्रकने धडक दिली होती. त्यावेळी सुदैवाने वाहिनी तुटून पडली नाही, अन्यथा मोठी प्राणहानी होऊ शकली असती. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. 

महापालिकेने विद्युतखांबांच्या शिफ्टिंगची रक्कम भरल्यानंतर महावितरण तत्काळ निविदा काढून खांब शिफ्ट करून देते. मात्र, त्यासाठी महापालिकेने पैसे भरणे आवश्‍यक आहे.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरण 

महापालिका आवश्‍यकतेनुसार विद्युतखांब शिफ्ट करण्याचे पैसे भरीत आहे. कमी निधीमुळे या कामावर परिणाम झाला आहे. लवकरच या कामाला गती येणार आहे.’’ 
- के. डी. देशमुख, विद्युत उपअभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT