Accident esakal
मराठवाडा

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; अंबड-जालना महामार्गावरील घटना

मुलाकडे जालन्याला जात असताना शेवगा फाटा येथे त्यांच्या दुचाकीला कोण्यातरी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड-जालना महामार्गावरील (Ambad Jalna Highway) शेवगाफाट्यावर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक (Accident) दिल्याने दुचाकी चालक जाग्यावर गतप्राण (Death) झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घनसावंगी तालुक्यातील गुंज बु.येथील रहिवासी तथा अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्यातील अकाउंट विभागातील कर्मचारी गोवर्धन काशिनाथ काजळे (वय 43) यांचा अपघातात जागीच मृत्यु झाला आहे.

पारनेरपेट्रोल पंप येथुन विवाह समारंभ उरकुन ते अंबड कडुन जालना शहराकडे रविवारी (ता.26) दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मुलाकडे जालण्याला जात असताना शेवगा फाटा येथे त्यांच्या दुचाकीला कोण्यातरी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ते जागेवर ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष वनवे, फलटनकर, सतीश देशमुख, चव्हाणसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळी पोलिस पंचनामा केला.

ग्रामस्थांच्या वतीने मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन दाखल केला. रात्री उशिरा गुंज बु.त्यांच्या मूळगावी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडीलसह आदी मोठा परिवार आहे. अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT