मराठवाडा

बीड : भरधाव कारच्या धडकेत 3 ठार तर 3 जण गंभीर जखमी

जखमीस अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संजय रानभरे

घाटनांदूर (जि.बीड) : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गा लगत बोलत उभ्या असलेल्या चौघांना भरधाव कारने धडक दिल्याने चौघा पैकी दोन युवक जागीच ठार एकास लातूरला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला तर कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमीस अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घाटनांदूर पोलीस चौकी समोर (ता.४) सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान घडला आहे.

अंबाजोगाईहून नातेवाईकांचा अंत्यविधी उरकून अहंदपूरला परत जाणाऱ्या भरधाव कार (एमएच २४ व्ही२५१८) चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने घाटनांदूर येथील पोलीस चौकीसमोर रस्त्यालगत असलेल्या पानपट्टीसमोर बोलत उभे असलेल्या चौघांना कारने भरधाव वेगात धडक दिल्याने वैभव उर्फ सौरभ सतीश गिरी(वय १८) लहू बबन काटुळे (वय ३०) हे दोघे जागीच ठार झाले तर रमेश विठ्ठल फुलारी(वय ४५) (सर्व घाटनांदूर ) ह्याला उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना रस्त्याचं मृत्यू झाला तर उद्धव निवृत्ती डोमपले (वय ४७) (नवाबवाडी येथील सालगडी) कार चालक अलिम शेख(वय२५) दीपक वैजनाथ राजारोशे (वय ३५) (रा.अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेने रस्त्यालगत असलेले लोखंडी खांब उपटून खाली पडला. अपघात एवढा भीषण होता की पाहणाऱ्या अंगावर शाहारे आले. एकाच अपघात तिघांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, आबाजोगाईचे पोलीस अधीक्षक सुनील जायभाये यांनी अपघात स्थळाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT