Accident News sakal
मराठवाडा

Accident News : दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार

अंबड-जालना महामार्गावरील हारतखेडा फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार, दोन जण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

अंबड : अंबड-जालना महामार्गावरील हारतखेडा फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार, दोन जण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला.

अंबड-जालना महामार्गावरील हारतखेडा फाटा येथे सोमवारी (ता. १०) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान अंबडकडून हारतखेडा फाट्याकडे दुचाकीने घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु. येथील एकनाथ ज्ञानदेव आंधळे (वय ४३) आणि वाघलखेडा येथील परसराम डोके जात होते.

यावेळी जालनाकडून अंबडकडे दुचाकीने तालुक्यातील पराडा येथील मायकल सुभाष नाटकर (वय २८) व त्याचे काका भास्कर राधाकृष्ण नाटकर (वय ४५) जात होते. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये एकनाथ ज्ञानदेव आंधळे (वय ४३) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर मायकल नाटकर व भास्कर नाटकर हे गंभीर जखमी झाले.

त्यांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, परसराम डोके किरकोळ जखमी झाले आहेत. माहिती मिळताच हारतखेडा, सारंगपूर, शेवगा, धनगरपिंपरी, मठपिंपळगावसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT