Latur Accident News esakal
मराठवाडा

Latur : लातूर-नांदेड महामार्गावर अपघात, चापोलीच्या तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू

द्वारकानाथ मद्रेवार हे मोटारसायकलवरून लातूरकडे निघाले होते.

प्रशांत शेटे

चाकूर (जि.लातूर) : लातूर-नांदेड महामार्गावरील घरणीजवळ (ता.चाकूर) भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्यामुळे चापोली येथील ४५ वर्षीय व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.१४) दुपारी घडली आहे. चापोली येथील द्वारकानाथ मद्रेवार हे सोमवारी दुपारी मोटारसायकलवरून लातूरकडे (Latur) निघाले होते. घरणी गावाच्या जवळ त्यांना (एमएच २६ बीई ७४१९) भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिली. (Accident Take Place On Latur Nanded Highway, Young Trader Died)

यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. मृत द्वारकानाथ मद्रेवार हे अत्यंत मनमिळाऊ व्यापारी म्हणून परिचीत होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भात थंडीचा कडाका वाढणार, किमान तापमान ८.६ अंशांवर; हवामान विभागाचा अंदाज समोर

Latest Marathi News Live Update : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला आजपासून होणार प्रारंभ

EVMवर आता राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आधी, नंतर प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष; ZP, पंचायत समिती निवडणुकीच्या नियमात बदल

US Self Deportation Offer : अमेरिकेची भारतीयांसह बेकादेशीर स्थलांतरितांसाठी मोठी ऑफर; हजारो डॉलर, मोफत विमान तिकिट घ्या अन्...

Solapur Crime:'साेलापुरात तीन वर्षाच्या चिमुकल्याचा खून'; आई जोरजोरात रडत हाेती, धक्कादायक सत्य उघड, काय घडलं?

SCROLL FOR NEXT