Accident to BJP Madhav Bhandari vehicle ram kulkarni beed sakal
मराठवाडा

भाजपचे माधव भंडारी यांच्या वाहनाला अपघात

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री जिल्ह्यातील मस्साजोग जवळ घडली

सकाळ वृत्तसेवा

बीड/केज : भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना शनिवारी (ता. १५) रात्री जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) जवळ घडली. समोरून येणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात श्री. भंडारी आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. श्री. भंडारी यांच्या हस्ते शनिवारी बीडमध्ये एक पुस्तक प्रकाशन झाले. हा कार्यक्रम आटोपून ते रविवारी अंबाजोगाई येथील व्याख्यानासाठी वाहनाने जात होते.

त्यांच्यासोबत प्रवक्ते कुलकर्णीदेखील होते. मस्साजोगजवळ त्यांच्या समोरून येणारा ॲपेरिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने पलटी झाला आणि भंडारी यांच्या कारला धडकला. भंडारी यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतली. माधव भंडारी, राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. रिक्षाचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर भंडारी हे अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झाले असून, ते तिथे मुक्कामी असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

SCROLL FOR NEXT