photo 
मराठवाडा

निवासस्थाने नटली पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला

नवनाथ येवले

नांदेड : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची डागडूजी, रंगरगोटीच्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. खाते वाटपापूर्वीच निवासस्थानांच्या डागडूजींकडे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या शेषमधून लाखो रुपये खर्चुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागताला निवासस्थाने सजविण्यात येत आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची डागडूजी वर्षातून किमान एक वेळा ठरलेलीच असते. पण, उशिरा पदाधिकारी निवडीमूळे यंदा मार्चपूर्वीच या कामाला सुरवात झाली आहे.

जिल्हा परिषद कारभारी निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सोईनुसार निवासस्थानांची डागडूजी, रंगरंगोटी करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून निवासस्थानातील स्वच्छतागृह, छत, व्हरांडा, फरसी, गिलावा आदी किरकोळ दूरुस्त्या करण्यात येतात. दरम्यान, निवासस्थानी पदाधिकाऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यात येत असल्यातरी इमारत देखभालीसह दूरुस्तीकडे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष राहते. निवासस्थानाच्या डागडूजीसाठी बहूधा मार्चअखेरीचा मुहूर्त ठरलेलाच असतो. ऐनवेळी मधल्या काळातही काही पदाधिकारी निवासस्थानाची डागडूजी, रंगरंगोटी करुन घेतात; पण यंदा मार्चअखेर पूर्वीच निवासस्थानाची डागडूजी, रंगरंगोटीच्या मागे निवडीचे कारण आहे.

हेही वाचा - नांदेड शहर विकास आरक्षण आराखड्याचे वास्तव्य...वाचा... ​

शिपायांच्या नियुक्त्या
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवासस्थानाचा वापर केवळ विसाव्यासाठी करत असले तरी, निवासस्थानांच्या देखभालीसाठी शिपायांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवासस्थानावर येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांच्या पाहूणचारापासून साफसफाई, पाणी, फर्निचर देखभालींची जबाबदारी शिपायांवर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर निवासस्थानाच्या देखभालीवर पदाधिकाऱ्यांचे प्रशासकीय स्वीय्य सहायकाचे नियंत्रण असल्याने निवास्थानामध्ये येणाऱ्यांच्या नोंदीची माहिती अद्यवत ठेवली जाते.

विसाव्यासाठी निवासस्थान
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आपल्या मुळ निवासस्थानी राहून जिल्हा परिषदेचा कारभार पाहतात. मुख्यालय परिसरात सरकारी निवासस्थानांचा वापर त्यांच्या स्वत:च्या निवास आणि विसाव्यासाठी अधिक केला जातो. कामानिमित्त येणाऱ्या खेडेगावातून आलेल्या कार्यकर्त्यांना मुक्कामासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवास्थानाचा मोठा आधार मिळतो. त्यामुळे निवासस्थानाच्या देखभालीसाठी दिवसरात्र शिपायांची नियुक्ती महत्वपुर्ण ठरते. सभागृहाच्या कामजाकासाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या पदाधिकारी निवासस्थानी विसावा घेवून कामकाजासाठी बाहेर पडतात. त्यामुळे निवासस्थानाची शोभा पदाधिकाऱ्यांच्या पाहूणचारात भर घालणारी ठरते.

येथे क्लिक करामराठवाड्यातील हवामान बदलू शकते : कसे, ते वाचलेच पाहिजे ​

निवासस्थाने सजली
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर मागील आठवड्यात जिल्हा परिषदच्या विषय समित्यांच्या कारभाऱ्यांची निवड झाली. यामध्ये महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण खात्याचे कारभारी निश्चित करण्यात आले. मात्र, शिक्षण व आरोग्य आणि बांधकाम व अर्थ खाते अद्याप वाटप करण्यात आले नाहीत. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी कक्षासह निवासस्थानावर ताबा मिळवला. सोईनुसार वास्तूमध्ये किरकोळ बदलांसह डागडूजीचे काम सुरू आहे. यामध्ये उपाध्यक्ष पद्मारेड्डी सतपलवार, शिक्षण व आरोग्य सभापतींचे निवास्थानाचे काम अंतिम टप्यात आहे, तर अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महिला व बालकल्याण सभाती सुशीला बेटमोगरेकर, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण सभापतींच्या निवासस्थानांच्या डागडूजीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंना एकच दिवस परवानगी मिळालीय, सरकार काय करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही....''

PCMC News : काळेवाडी भुयारी मार्गातील अस्वच्छता आणि असुरक्षा; महिलांची सुरक्षा धोक्यात

Manoj Jarange News: भीम आर्मीचा मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Himachal Flood: जोर ओसरूनही जनजीवन विस्कळित; हिमाचलमध्ये रावी नदीला अचानक पूर, वाराणसीत गंगाआरतीला अडथळा

Gauri festival : गणेशोत्सवानंतर आता गौराईंची तयारी; कापडी फुलांसह ज्वेलरी सेट खरेदीसाठी बाजारात गर्दी

SCROLL FOR NEXT