फोटो 
मराठवाडा

हातकडीसह आरोपी फरार, पोलिसांना बलविले मामा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पोलिस कोठडीतील आरोपी येथील विष्णुपूरी शासकिय रुग्णालयात उपचार घेताना पोलिसांना चकमा देऊन हातकडीसह फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक विविध भागात रवाना करण्यात आले आहे. ही प्रकार शनिवारी (ता. १९) च्या रात्री घडला. 


वजिराबाद पोलिस ठाण्यांतर्गत अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पंजाब राज्यातील राजेंद्रसिंग तेजविंदरसिंग याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे हिरॉईन हे अमली पदार्थ जप्त करून गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. तो पोलिस कोठडीत असताना छाती दुखत असल्याचा बहाणा करून उपचार घेण्याची पोलिसांनी विनंती केली. त्यावरून वजिराबाद पोलिसांनी त्याला शासकिय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.

हातकडीसह फरार 

यावेळी पोलिस कर्मचारी संजयकुमार पवार, वाघमारे, लोहगावे, उखंडे यांनी ताब्यात घेवून त्याच्या उजव्या पायाला हातकडी लावून रुग्णालयात दाखल केले. यावेळी पवार हे आरोपीसाठी पांघरून आणण्यासाठी गेले असता, लोहगावे हे आरोपीवर नजर ठेवून होते. परंतु त्यांची नजर चुकवून आरोपी हातकडीसह फरार झाला. पळून गेल्याचे लक्षात येताच कर्तव्यावरील पोलिस व होमगार्ड यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत त्याने अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला. आजपर्यंत त्याला पोलिसांनी पकडले नाही. याप्रकरणी संयज पवार यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कर्तव्यावरील पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार

शासकिय  रुग्णालयातून यापूर्वीही उपचारादरम्यान अट्टल आरोपी हातकडीसह फरार झाल्याच्या घटना घडल् असतांना कर्तव्यावरील या पोलिसांनी त्याच्यावर विश्वास कसा ठेवला. हा प्रश्‍न महत्वाचा आहे. एवढेच नाही तर रुग्णालयाला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैणात आहेत. एरव्ही सर्वसाधारण रुग्णांच्या नातेवाईकांना भंडावून सोडणारे हे जवानही झोपी गेले होते का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. फरार आरोपी जर सापडला नाही तर कर्तव्यावरील पोलिसांना मात्र कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT