file photo 
मराठवाडा

हिंगोली दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीस पाथरीत अटक; परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गणेश पांडे

परभणी ः हिंगोली येथील एका दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.16) पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चारचाकी वाहन ही जप्त करण्यात आले आहे.

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद अशोक मस्के (वय 29, रा. तळेगाव ता. घनसावंगी जि.जालना) हा पाथरी येथे फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट वाहन घेवून येत असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. बंदखडके यांनी परभणी स्थानिक गुन्हे शाखेला दिली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार चंद्रकात पवार यांनी पाथरी येथील सेलू कॉर्नरवर सापळा लावून या वर्णनाची गाडी व आरोपीस ताब्यात घेवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हिंगोली येथे घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीस गुन्ह्यामधील वापरलेल्या दोन चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकात पवार, फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, पाथरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्री.राऊत, कर्मचारी श्री.गिराम यांनी ही कारवाई केली.

गाडीचे नंबर ही बदलले

परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी विनोद अशोक मस्के यास अटक करून अधिक तपासासाठी हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. आरोपीकडे गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची गाडी (क्र.एम.एच.12, व्हि.जी. 9999) या गाडीचे कागदपत्र तपासले असता तीचा आर.टीओ पासींग (क्र. एम.एच. 22 ए.डी. 7) असा असल्याचे समजले. आरोपीने गाडीचा नंबर चोरी करण्याच्या उद्देशाने बदललेला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill : वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT