file photo
file photo 
मराठवाडा

‘मोक्का’तील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गणेश पांडे

परभणी : वाटमारी करून लोकांना जबर जखमी करणाऱ्या एका टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. या टोळीतील मुख्य आरोपीला चारठाणा (जि.परभणी) पोलिसांनी शुक्रवारी (ता. आठ) सिंदखेडराजा येथून ताब्यात घेतले.
नागठाणा (ता. सेलू, जि.परभणी) येथील रहिवाशी गोविंद श्रीमंत मोगल हे ता. २७ डिसेंबर २०१८ रोजी सेलू येथून नागठाणा येथे येत असतांना खैरी पाटीजवळ आले असता त्यांना मोबाइल फोन आल्याने ते बोलत होते. त्या वेळी आरोपी सुनील यानमन पवार याने त्यांच्या पाठीमागून पकडून खाली पाडले व चाकूने मांडीवर मारहाण करून त्यांना जबर जखमी केले. त्यांच्याकडील रोख ६१ हजार रुपये व दोन मोबाइल, असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेले. गोविंद श्रीमंत मोगल यांच्या फिर्यादीवरून चारठाणा येथे सुनील यानमन पवार व इतर पाच आरोपींविरुद्ध ता. २८ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिंदखेडराजा येथे शिताफीने अटक 
सदर गुन्ह्यातील आरोपी सुनील यानमन पवार व इतर तीन आरोपींना चारठाणा पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. या प्रकरणी पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्या यांच्या आदेशानुसार या आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी बिरजू फत्तू भोसले हा अद्यापही पोलिसांना गुंगारा देत होता. ता. आठ मे रोजी मिळालेल्या माहितीवरून चारठाणा येथील पथकाने या आरोपीचा शोध घेऊन त्यास सिंदखेडराजा येथे शोध घेऊन शिताफीने अटक केली. 

 १५ मेपर्यंत पोलिस कोठडी
आरोपीस मोक्का कोर्ट औरंगाबाद येथे हजर केले असता त्यास न्यायालयाने ता. १५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. लहाने, पोलिस हवालदार शेख, पोलिस कर्मचारी जाधव, इधारे, भानुसे यांनी केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलिस नायक गजानन राठोड हे करीत आहेत.

हेही वाचा...

कापसाच्या ट्रकला आग
सेलू (जि.परभणी) :
सेलू शहरातील नवा मोंढा परिसरात एका कापसाच्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी (ता. ११) दुपारी घडली. या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.
उन्हाची तीव्रता पाहता कापसाने आगीचा भडका चांगलाच घेतला होता. मात्र, येथील नागरिकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. कोरोना संसर्गाने लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात शेतकऱ्याचा शेतमाल पडूनच होता. त्यावर तोडगा काढत शासनाने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी मुभा दिली होती. 

लाखो रुपयांचे नुकसान 
यात किरकोळ विक्रेते( फडीवाले) यांनी दोन-तीन दिवस महिन्यात १०० क्विंटल कापूस खरेदी केला होता. त्या कापसाला विक्रीसाठी नवा मोंढा येथील मार्केटमध्ये पाठविण्याच्या लगबगीत असताना अचानक कापसाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. या घटनेत व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT