papai 
मराठवाडा

एकरभर शेतीत हळदीमध्ये पपईचे आंतरपीक  

शशीकांत धानोरकर

तामसा : हळदीमध्ये पपईच आंतरपीक घेऊन एकरभर रानामध्ये वर्षभर कष्ट उपसलेल्या धानोरा (ता. हदगाव) येथील शेतकरी टोपाजीराव शिंदे व त्यांच्या पत्नी सुंदरबाई यांच्या कष्टाचे चीज होऊन पपई व हळदीतून शिंदे कुटुंबीयांना तब्बल साडेदहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. येथील शिंदे दाम्पत्य, त्यांचे दोन्ही मुले, सुना यांची या भागात शेतातील शेतकरी कुटुंब अशी ओळख आहे.

सर्व शिंदे कुटुंबीयच शेतामध्ये दिवस-रात्र शेताची काळजी करत असतात. शेतातील पिकांची निगा राखण्यामध्ये कुठलीच कसर राहणार नाही, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा येथे पाहायला मिळते. टोपाजीराव यांनी आपल्या एकरभर शेतामध्ये गतवर्षी हळदीमध्ये पपईचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. पपईचे एक हजार झाड त्यांनी शेतात लावले. पपईने जरी साथ दिली नाही तरी हळद मात्र, निश्चित सांभाळून घेईल, असा त्यांना विश्वास होता. पण वर्षभराच्या काबाडकष्टानंतर हळदीपेक्षा पपईने त्यांना मोठा आर्थिक आधार दिला. 

व्यापारी थेट बांधावर दाखल
हजारातली सातशे झाडे त्यांनी सांभाळून जगविली. पपईचे झाड भरल्यानंतर मजबूतपणे उभे राहावे म्हणून त्याला गोमूत्र, चूनपीठ, गूळ, थोडी काळी माती यांचे मिश्रण करून तीन वेळेस मात्रा दिली. याचा चांगला परिणाम म्हणून पपईने आवश्यक ती उंची गाठून आकारही धारण केला. त्यावर किडीचा, रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर केला. त्यामुळे वर्षाच्या शेवटी शिंदे दाम्पत्याच्या सामूहिक प्रयत्नांचे चीज होऊन त्यांना पपईतून अंदाजे साडेसहा लाख रुपये उत्पन्न झाले, तर हळदीतून अंदाजे चार लाख रुपयांची मिळकत झाली. शिंदे यांच्या शेतातील पपईचा दर्जा, चव बघून मालेगाव व हदगाव येथील पपईचे व्यापारी थेट धानोरा येथे त्यांच्या शेतबांध्यावर डेरेदाखल झाले होते. 

पपईने केला धनवर्षाव
शेतातील पपईची झाड तब्बल दोनशेच्या वर पपयांनी लगडले होते. हळदीपेक्षा पपईतून त्यांना अनपेक्षित मिळकत झाली. विशेष म्हणजे टोपाजीराव शिंदे हे शेतावर विश्वास ठेवतात. प्रतिकूल निसर्ग हा जरी शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला असला तरी प्रयत्नातून प्रतिकूलतेवर मात होऊ शकते, असा त्यांना विश्वास आहे. त्यांनी हे शक्य व सिद्धही केलेे आहे.

पपईने भरघोस उत्पादन दिले
माझे संपूर्ण कुटुंबीय शेतामध्ये राबत असते. शेती हेच आमचे घर समजतो. कुटुंबीयांची साथ अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. हळदीमध्ये आंतरपीक म्हणून पपई घेतली. पपईने आम्हाला भरघोस उत्पादन देऊन आर्थिक आधार दिला. करणाऱ्याची व कसणाऱ्यांची शेती आहे, याची प्रचिती आम्ही आमच्या शेतामध्ये नियमितपणे घेत असतो. - टोपाजीराव शिंदे, शेतकरी, धानोरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी पाच याचिकांच्या संदर्भात अपात्रता याचिका फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT